AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट भेदभाव करत नाही, भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश

सिडनी कसोटीच्या चौथ्या दिवशी काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केली होती.

क्रिकेट भेदभाव करत नाही, भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 11, 2021 | 9:13 AM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात (Aus vs Ind 3rd Test) तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान शनिवारी आणि रविवारी (सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी) भारतीय खेळाडू मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांवर काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी वर्णद्वेषी टीका केली. याप्रकरणी सुरक्षारक्षकांनी 6 प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी केली. याप्रकरणावरुन जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांचं मत मांडलं आहे. काही खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकरनेदेखील या प्रकरणावरुन एक खास संदेश दिला आहे. सचिनने म्हटलं आहे की, खेळ सर्वांना जोडतो, लोकांना एकमेकांपासून वेगळं करत नाही. (Sachin Tendulkar tweets on Mohammed Siraj racial abuse)

सचिनने या प्रकरणावरुन एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, “क्रिकेट कधीही कोणत्याही खेळाडूसोबत भेदभाव करत नाही. बॅट आणि बॉलला माहीत आसतं की ते ज्याच्या हातात आहेत तो किती प्रतिभावान आहे. बॅटला आणि बॉलला हे माहीत नसतं की त्याचा रंग, त्याचा वर्ण, धर्म किंवा त्याचा देश कोणता आहे. ज्या लोकांना हे कळत नाही, असा लोकांसाठी खेळाच्या मैदानात कोणतीही जागा नाही.”

दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, सर्व आरोपींची स्टेडियमधील सुरक्षा अधिकारी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच लागोपाठ दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकाराबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी भारतीय खेळाडूंची माफी मागितली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला आश्वासन देण्यात आले आहे की, या प्रकरणात त्वरित कारवाई केली जाईल. (Ind vs Aus : CA Apologise to Indian Team For Alleged Racism Incident At SCG)

साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळही करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका (Racial Abuse) करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या दोघांना शनिवारी (सामन्याच्या तिसऱ्या दिवशी) शिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या सर्व प्रकरणाबाबत टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणात आयसीसीने लक्ष घातलं असून कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु त्याचा काहिही परिणाम झाला नाही. कारण काल (रविवारी) सामन्याच्या चौथ्या दिवशीदेखील काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केली.

सिराजवर पुन्हा वर्णद्वेषी टीका झाल्यानंतर कप्तान अजिंक्य रहाणे शांत बसला नाही. सिराजने तक्रार करताच कर्णधार रहाणेने याबाबत पंचांकडे तक्रर केलीच सोबतच सामनादेखील थांबवला. कर्णधार रहाणेने घेतलेल्या भूमिकेनंतर पंच आणि पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पंचांनी पोलिसांच्या मदतीने सिराजवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी केली.

कप्तान रहाणेने सामना रोखला

सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसऱ्या सत्रात शेवटचं षटक टाकण्यास सुरुवात करत होता. त्यादरम्यान सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी सिराजच्या मागे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी सिराजवर कमेंट्स करणं सरु केलं. तेव्हा कप्तान रहाणेने बुमराहला गोलंदाजी करण्यापासून रोखले. त्यानंतर रहाणेने सिराजशी बातचित केली आणि थेट पंचांना गाठून त्यांच्याकडे तक्रार केली. यादरम्यान संपूर्ण भारतीय संघ खेळपट्टीजवळ एकत्र जमला. त्यानंतर पंचांनी आणि पोलिसांनी स्टँडमध्ये जाऊन संबंधित प्रेक्षकांना स्टेडियमधून बाहेर जाण्यास सांगितले. यादरम्यान भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्येदेखील नाराजी दिसत होती. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील टीम सिक्युरिटीशी बातचित केली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काय घडलं होतं?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एक क्रिकेट चाहता हा सामना पाहायला आलेला. हा चाहता दारु पिऊन आला होता. या मद्यधुंद चाहत्याने शिवीगाळ केली. या चाहत्याने मोहम्मद सिराजला माकड म्हटल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. तसेच बुमराह आणि सिराजला शिवीगाळ केल्याचं प्रकारही समोर आला. या सर्व प्रकारानंतर टीम इंडियाने सामनाधिकारी डेव्ही बून यांच्याकडे तक्रार करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अश्विनसह इतर खेळाडूंनी फिल्ड अंपायर यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शिवीगाळ केल्याचं सांगितले गेलं. यानंतर अंपायर आणि संबंधित यंत्रणेने बुमराह आणि सिराजसोबत चर्चा केली. तसेच टीम इंडियाच्या सिक्युरिटी संबंधित अधिकाऱ्यांनी मैदानातील सुरक्षा कर्मियांना याबाबत विचारणा केली. यावेळेस आयसीसीचे सुरक्षाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान हा सर्व प्रकार आयसीसीपर्यंत पोहचला आहे.

संबंधित बातम्या

प्लॅटिना बाईक ते आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाची टीका, वाचा मोहम्मद सिराजची संघर्षगाथा

“माझ्यावरही वर्णभेदी टीका करण्यात आली होती”, अश्विनचा धक्कादायक खुलासा

(Sachin Tendulkar tweets on Mohammed Siraj racial abuse)

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर