AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर या भारतीय खेळाडूला बसला मोठा धक्का! थेट संघातून केलं बाहेर

भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवून आला आहे. असं असताना खेळाडू आता पुढच्या स्पर्धांच्या तयारीला लागले आहेत. असं असातना एका खेळाडूला मात्र मायदेशी परताच धक्का बसला आहे. झालं असं की...

इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर या भारतीय खेळाडूला बसला मोठा धक्का! थेट संघातून केलं बाहेर
इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर या भारतीय खेळाडूला बसला मोठा धक्का! थेट संघातून केलं बाहेरImage Credit source: PTI
| Updated on: Aug 09, 2025 | 6:29 PM
Share

भारताने इंग्लंडमध्ये खेळलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. भारताने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशी परतला असून आशिया कप आणि देशांतर्गत स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू घाम गाळणार आहेत. असं असताना साई सुदर्शनला मात्र फटका बसला आहे. इंग्लंडमध्ये तीन सामन्यात 23.33 च्या सरासरीने त्याने 140 धावा केल्या होत्या. यात त्याने 61 धावांची सर्वोत्तम खेळी केली. मात्र भारतात परतल्यानंतर साई सुदर्शनला संघातून डावललं आहे. क्रीडाप्रेमींना असं काही झालं यावर विश्वास बसत नाही. पण तसंच झालं आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी साऊथ झोनने संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व तिलक वर्माकडे असेल. पण या संघातून साई सुदर्शनला डावलण्यात आलं आहे.

बुचि बाबू इन्विटेशनल स्पर्धेसाठीही तामिळनाडू क्रिकेट संघाने दोन संघ जाहीर केले. मात्र त्यातही साई सुदर्शनचं नाव नाही. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने टीएनसीए 11 आणि टीएनसीए प्रसिडेंट 11 टीम जाहीर केली आहे. या दोन्ही संघात साई सुदर्शनला स्थान मिळालेलं नाही. साई सुदर्शनने आयपीएल 2025 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत 51.21 च्या सरासरीने 156.17 च्या स्ट्राईक रेटने 759 धावा केल्या होत्या. त्याला ऑरेंज कॅपही मिळाली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याला कसोटी संघात स्थान मिळालं होतं. पण आता देशांतर्गत स्पर्धेतून डावललं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. टीएनसीए प्रसिडेंट 11 साई किशोर, तर टीएनसीए 11 कर्णधारपद प्रदोष रंजन पॉलकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपद बूपति वैष्ण कुमारकडे सोपवलं आहे.

बुचि बाबू इन्विटेशनल स्पर्धेसाठी संघ

टीएनसीए 11: आर. साई किशोर (कर्णधार), सी. आंद्रे सिद्दार्थ सी (उपकर्णधार), बी. इंद्रजीत, विजय शंकर, एम. शाहरुख खान, आर. विमल खुमार, एस. राधाकृष्णन, एस. लोकेश्वर, जी. अजितेश, जे. हेमचुदेशन, एम. सिद्धार्थ, आर.एस. अंबरीश, सी.वी. अच्युत, एच. त्रिलोक नाग, पी. सरवण कुमार आणि के. अभिनव

टीएनसीए प्रेसिडेंट 11: प्रदोष रंजन पॉल (कर्णधार), बूपति वैष्ण कुमार (उपकर्णधार), बी. सचिन, तुषार रहेजा, किरण कार्तिकेयन, एस. मोहम्मद अली, एस. रितिक ईश्वरन, एस.आर. आतिश, एस. लक्ष्य जैन, डी.टी. चन्द्रशेखर, पी. विद्युत्, आर. सोनू यादव, डी. दीपेश, जे. प्रेम कुमार, ए. एसाक्कीमुथु आणि टी.डी. लोकेश राज.

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी