Video : सीएसके सोडण्याबाबत अश्विनने अखेर मौन सोडलं, संजू सॅमसनसमोरच खरं सांगितलं
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी आर अश्विन आणि संजू सॅमसन हे दोघं फ्रेंचायझी सोडणार अशा बातम्या समोर येत आहेत. आर अश्विनने तर स्वत: अशी इच्छा व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. यावर आता आर अश्विनने मौन सोडलं आहे. याबाबत खरं काय ते सांगून टाकलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींनी आतापासूनच कंबर कसली आहे. जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघातून काही जणांना बाहेरचा रस्ता, तर काही जणांसाठी पायघड्या घातल्या जात आहे. असं असताना दोन खेळाडूंची जोरदार चर्चा रंगली आहे. यात आर अश्विन आणि संजू सॅमसन फ्रेंचायझी सोडणार असल्याची चर्चा आहे. मिडिया रिपोर्टनुसार, संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्याने फ्रेंचायझीला सोडण्याची किंवा ट्रेड करण्याची मागणी केली आहे. तर आर अश्विन स्वत:हून चेन्नई सुपर किंग्सपासून वेगळं होणार असल्याचं बोललं जात आहे. अशा सर्व चर्चा सुरु असताना आर अश्विनने मिश्किलपण यावर मौन सोडलं आहे. तसेच या अफवांना पूर्णविराम दिला आहे. अश्विनने नुकतंच युट्यूब शोमध्ये याचा उलगडा केला आहे. कुट्टी स्टोरीज विथ अॅश या कार्यक्रमाचा टीझर समोर आला आहे. यात अश्विन संजू सॅमसनसोबत दिसणार आहे.
या कार्यक्रमाच्या टीझरमध्ये आर अश्विन या चर्चांबाबत बोलला आहे. त्याने सांगितलं की, ‘मला तुम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत. तत्पूर्वी मी विचार केला, मी थेट माझ्याशी ट्रेड करू. मी केरळमध्ये राहण्यास खूश आहे. खूप साऱ्या अफवा उडाल्या आहेत. मला स्वत:ला याबाबत काही माहिती नाही. मी विचार केला की मी तुम्हाला विचारी. जर मी केरळमध्ये राहू शकतो आणि तुम्ही चेन्नईमध्ये परत जाऊ शकता.’ आर अश्विनच्या वक्तव्यावर संजू सॅमसनला हसला आणि हे मजेशीर क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Sanju on #KuttiStoriesWithAsh, powered by @PeterEngland_. Drops tomorrow afternoon. pic.twitter.com/J2QQ5Ia5eZ
— Kutti Stories with Ash (@crikipidea) August 8, 2025
रिपोर्टनुसार, संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझी यांच्यात वाजलं आहे. संजू सॅमसन आपल्या पुढच्या कारकिर्दीबाबत संभ्रमात आहे. मागच्या पर्वात सुरुवातीच्या काही सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे रियान परागकडे धुरा सोपवण्यात आली होती. राजस्थान रॉयल्सने त्याला 18 रुपये मोजून रिटेन केलं होतं. तर आर अश्विनला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 लिलावात 9.75 कोटी मोजून संघात सहभागी केलं होतं. पण खेळलेल्या 9 सामन्यात फक्त 7 विकेट घेतल्या होत्या. आता चर्चा अशी आहे की, संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडे आणि आर अश्विन राजस्थान रॉयल्सकडे जाऊ शकतो. ट्रेड विंडोच्या माध्यमातून हा करार होण्याची शक्यता आहे.
