गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर वन हँण्डेड जबरदस्त कॅच, ज्याने पाहिलं तो दंग झाला, पहा VIDEO

वनडे आणि टी 20 सीरीजनंतर (T 20 Series) दक्षिण आफ्रिकेचा संघ आता इंग्लंड विरुद्ध (ENG vs SA) कसोटी मालिका खेळणार आहे.

गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर वन हँण्डेड जबरदस्त कॅच, ज्याने पाहिलं तो दंग झाला, पहा VIDEO
dean-elgar
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 10, 2022 | 12:20 PM

मुंबई: वनडे आणि टी 20 सीरीजनंतर (T 20 Series) दक्षिण आफ्रिकेचा संघ आता इंग्लंड विरुद्ध (ENG vs SA) कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडच्या लायन्स संघाविरुद्ध सराव सामना खेळतोय. कॅटरबरीच्या सेंट लॉरेंस ग्राऊंडवर हा सामना सुरु आहे. या चार दिवसीय सराव सामन्याच्या (Practice Match) पहिल्या दिवशी एक थक्क करुन सोडणारी कॅच पहायला मिळाली. विकेटकीपर सॅम बिलिंग्सने हा कॅच घेतला. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सॅम बिलिंग्सने ही कॅच क्रेग ओवर्टनच्या चेंडूवर घेतली.

सॅम बिलिंग्सने घेतला जबरदस्त झेल

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार डीन एल्गर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. क्रेग ओवर्टनने राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता. ओवर्टनच्या एका गुड लेंग्थ चेंडूने एल्गरच्या बॅटची कड घेतली. यष्टीपाठी गेलेल्या चेंडूवर सॅम बिलिंग्सने डाइव्ह मारुन एका हाताने जबरदस्त झेल घेतला. गोळीच्या वेगाने हा चेंडू आला होता.

दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची दमदार कामगिरी

सराव सामन्याच्या पहिल्यादिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 6 विकेट गमावून 282 धावा केल्या. ओपनर सारेल एर्वीने 88 चेंडूत 42 धावा फटकावल्या. डीन एल्गर 39 धावांवर आऊट झाला. मार्करम आणि पीटरसन स्वस्तात बाद झाले. पण मधल्याफळीतील फलंदाज रानी वॅन डर डुसेने 75 धावांची इनिंग खेळला. गोलंदाज खाया जोंडो 86 धावांची इनिंग खेळला.