KKR vs PBKS : 42 SIX पाहून कॅप्टन सॅम करनच क्रिकेटबद्दल विचार करायला भाग पाडणारं मत

| Updated on: Apr 27, 2024 | 12:07 PM

KKR vs PBKS : कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात काल अक्षरक्ष: कहर झाला. या एका मॅचमध्ये तब्बल 46 सिक्स मारण्यात आले. क्रिकेटच हे बदलत स्वरुप पाहून सॅम करनने विचार करायला भाग पाडणारं मत प्रदर्शन केलं.

KKR vs PBKS : 42 SIX पाहून कॅप्टन सॅम करनच क्रिकेटबद्दल विचार करायला भाग पाडणारं मत
PBKS
Image Credit source: PTI
Follow us on

IPL 2024 मध्ये 26 एप्रिलच्या संध्याकाळी जे झालं, ते सर्वांनी पाहिलं. प्रत्यकाने आपआपल्या पद्धतीने त्याचा आनंद घेतला. स्टेडियममध्ये सिक्सचा अक्षरक्ष: पाऊल पडला. पंजाब किंग्सचा कॅप्टन सॅम करनने जे अनुभवलं, त्यानंतर जे मत मांडल, ते खरोखरच विचार करायला भाग पाडणार आहे. सॅम करनच्या पंजाब किंग्सने IPL च नाही, T20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड रचला. PBKS ने ही मॅच जिंकली. कोलकाता नाईट रायडर्सच 262 धावांच टार्गेट त्यांनी 19 व्या ओव्हरमध्येच पार केलं. यावरुन पंजाबच्या फलंदाजांनी KKR च्या गोलंदाजांची कशी धुलाई केली असेल? त्याची कल्पना येते. सामना जिंकल्यानंतर सॅम करनने आश्चर्य व्यक्त केलं. क्रिकेटबद्दल तो मोठी गोष्ट बोलला.

सॅम करन क्रिकेटबद्दल काय बोलला? ते सांगूच. पण त्याआधी या मॅचमध्ये काय घडलं? ते समजून घेऊया. 26 एप्रिलच्या संध्याकाळी KKR आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. KKR ने पहिली बॅटिंग केली. एकूण 18 सिक्स त्यांनी मारले. 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून त्यांनी 261 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सच्या टीमने 24 सिक्स मारले. 262 धावांच विशाल लक्ष्य त्यांनी 8 चेंडू राखून पार केलं. अशा प्रकारे या मॅचमध्ये दोन्ही टीम्सनी मिळून 523 धावा करताना 42 सिक्स मारले.

काय म्हटलं सॅम करनने?

सॅम करन स्वत: 42 सिक्स मारले गेले, त्या मॅचचा भाग होता. तो आतमधून सुद्धा हलला. मॅचनंतर त्याने जे वक्तव्य केलं, त्यातून हे दिसून आलं. पंजाब किंग्सचा कॅप्टन प्रश्न विचारण्याच्या मुद्रेत म्हणाला की, क्रिकेट आता बेसबॉलमध्ये बदलतय, हो की नाही?

‘या विजयावर हक्क होता’

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 8 विकेट राखून विजय हे टीमसाठी टॉनिक सारख आहे, असं सॅम करन म्हणाला. “हा विजय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या विजायने आम्हाला 2 पॉइंट मिळाले, ते महत्त्वाचे आहेत. आम्ही या विजयाने पराभवाची मालिका खंडीत केली. पंजाब किंग्सचा या विजयावर हक्क होता, त्यांना तो मिळाला” असं सॅम करन म्हणाला.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण, कुठे?

KKR वरील विजयानंतर पंजाब किंग्सचे 9 सामन्यात 6 पॉइंट झाले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये 8 व्या स्थानावर असूनही ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. या पराभवाने KKR ला पॉइंट्स टेबलमध्ये फार नुकसान होणार नाही. आताही ते 8 सामन्यात 10 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत.