Team india | 3 मोठ्या प्लेयर्सची दुखापत ‘या’ खेळाडूच्या पथ्यावर, थेट टीम इंडियाकडून T20 मध्ये मिळणार संधी

Team india | दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध T20 सीरीज खेळणार आहे. त्यासाठी पुढच्या काही दिवसात स्क्वाडची घोषणा होऊ शकते. त्या सीरीजमध्ये कुठल्या खेळाडूना संधी मिळणार? हा प्रश्न आहे.

Team india | 3 मोठ्या प्लेयर्सची दुखापत या खेळाडूच्या पथ्यावर, थेट टीम इंडियाकडून T20 मध्ये मिळणार संधी
Team india
Image Credit source: AFP
| Updated on: Dec 29, 2023 | 10:14 AM

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानात तीन सामन्यांची T20 सीरीज होईल. या सीरीजमध्ये भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच खेळणं कठीण आहे. कारण त्याला दुखापत झालीय. त्याशिवाय हार्दिक पांड्या आणि ऋतुराज गायकवाडच खेळणं सुद्धा कठीण आहे. पांड्याबद्दल अशी बातमी होती की, तो अफगाणिस्तान विरुद्धच्या सीरीजमधून पुनरागमन करेल. पण त्या बद्दल चित्र अजून स्पष्ट नाहीय. हार्दिक पांड्याला वनडे वर्ल्ड कपमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर तो टीमच्या बाहेर आहे. सूर्यकुमार यादवही दुखापतग्रस्त आहे.

सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व केलं. गायकवाड टेस्ट टीमसोबत दक्षिण आफ्रिकेत होता, पण त्याला दुखापत झाली. सध्या भारताचे T20 मधील तीन स्टार प्लेयर बाहेर आहेत. अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 सीरीजमध्ये या तिघांची कमतरता जाणवेल.

तिघे बाहेर असल्याने त्याचा फायदा

T20 वर्ल्ड कप आधी भारतासाठी ही सीरीज खूप महत्त्वाची आहे. या सीरीजद्वारे वर्ल्ड कपसाठी भारताची टीम कशी असेल? या बद्दल बऱ्याच प्रमाणात चित्र स्पष्ट होईल. सिलेक्टर्स या सीरीजसाठी संजू सॅमसनला टीममध्ये संधी देऊ शकतात. संजूने नुकतच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये शतक झळकावल होतं. या T20 सीरीजनंतर भारत मायदेशात इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सीरीजच्या तयारीसाठी खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, विराट कोहली, शुभमन गिल कदाचित अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार नाहीत. टेस्ट सीरीजच्या तयारीसाठी त्यांना विश्रांती दिली जाऊ शकते. अशावेळी टीम इंडियात संधी असेल. अनुभव लक्षात घेऊन सिलेक्टर्स संजूला T20 सीरीजसाठी निवडू शकतात. संजू भारतासाठी शेवटचा T20 सामना यावर्षी ऑगस्ट महिन्यात आयर्लंड विरुद्ध खेळला होता.

नेतृत्व कोण करणार?

अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 सीरीजमध्ये यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह यांचं खेळण निश्चित मानल जातय. पण पांड्या, सूर्यकुमार, अय्यर या T20 सीरीजमध्ये खेळले नाही, तर नेतृत्व कोण करणार?. टीमकडे केएल राहुलचाही एक पर्याय आहे.