AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजू सॅमसनची क्रिकेट कारकिर्द ‘या’ खेळाडूमुळे संपुष्टात! हर्षा भोगलेच्या ट्वीटनंतर वादाची ठिणगी

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या एका ट्वीटने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. संजू सॅमसनचं क्रिकेट करिअर कोणामुळे खराब झालं याची चर्चा रंगली आहे. हर्षा भोगले यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. त्यामुळे चाहत्यांनी थेट आरोप प्रत्यारोप करत प्रश्नांचा भडीमार केला आहे. त्यानंतर हर्षा भोगलेला सारवासारवही करावी लागली.

संजू सॅमसनची क्रिकेट कारकिर्द 'या' खेळाडूमुळे संपुष्टात! हर्षा भोगलेच्या ट्वीटनंतर वादाची ठिणगी
विराट कोहलीमुळे या खेळाडूने बरंच काही गमावलं! हर्षा भोगलेच्या त्या ट्वीटमुळे जोरदार चर्चा
| Updated on: Dec 22, 2023 | 4:29 PM
Share

मुंबई : भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली. कधी संघात तर कधी संघाबाहेर अशा स्थितीत संजू सॅमसन असायचा. कधी कधी तर वाटेला फलंदाजीही यायची नाही. आली तर स्वस्तात बाद झाला की टीका व्हायची. अशा सर्व दिव्यातून जाऊनही संजू सॅमसनने काही मौन सोडलं नाही. तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्यात संजू सॅमसनला यश आलं. त्याच्या शतकी खेळीने टीकाकारांची तोंड काही काळासाठी का होईना बंद झाली आहेत. संजू सॅमसनचे चाहते त्याच्या शतकी खेळीने आनंदी झाले आहेत. असं सर्व सुरु असताना क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेच्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. कारण हर्षा भोगलेने संजू सॅमसनच्या करिअरसाठी विराट कोहलीला अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

हर्षा भोगलेने लिहिलं आहे की, संजू सॅमसन तिथेच फलंदाजी करत तिथे करायला हवी. हर्षा भोगलने संजू सॅमसन खेळायला उतरलेल्या तिसऱ्या क्रमांकाबाबत सांगितलं आहे. मात्र या स्थानावर विराट कोहलीने जागा पक्की केली आहे. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते भडकले आहेत. विराट कोहलीच्या चाहत्यांनी हर्षा भोगलेच्या ट्वीटवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला.

ठीक आहे, पण त्या स्थानावर फलंदाजीसाठी येत असलेल्या खेळाडूची कामगिरी त्याच्यापेक्षा सर्वोत्तम आहे. त्यानंतर हर्षा भोगलेनेही सारवासारव करत स्पष्टीकरण दिलं आहे. “त्या पोझिशनमध्ये खेळणारा खेळाडू हा आतापर्यंतचा महान फलंदाज आहे. येथे मी संजू सॅमसनसाठी सर्वोत्तम असलेल्या नंबरबद्दल बोलत आहे. टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर कोणी फलंदाजी करावी हे मी सांगितलेले नाही. कारण जोपर्यंत विराट कोहली आहे तोपर्यंत तो नंबर त्याचाच आहे .”

संजू सॅमसन वनडे क्रिकेटमध्ये बऱ्याचदा तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. त्याने 16 सामन्यांमध्ये 57 च्या सरासरीने 510 धावा केल्या. या काळात संजूने एक शतक आणि 3 अर्धशतकं ठोकली आहेत. संजूने या स्थानावर तिसऱ्यांदा फलंदाजी केली. त्यापैकी एका सामन्यात शतक ठोकलं. दुसरीकडे, विराट कोहलीने 225 सामन्यात या स्थानावर खेळताना 43 शतकांसह 61 च्या सरासरीने 12 हजार धावा केल्या आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.