
मुंबई : संजू सॅमसन हे टी20 फॉर्मेटमधलं आक्रमक नाव..आयपीएल आणि टी20 क्रिकेट स्पर्धेत त्याची कामगिरी अनेकदा अधोरेखित झाली आहे. पण त्याला वारंवार डावललं गेल्याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये आहे. पण आता टी20 संघात त्याची निवड झाल्याने त्याचा वर्ल्डकपच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेत टी20 संघात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याच्या निवडीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. वनडेत त्याने शतक ठोकल्याने त्यांनी निवडी समितीसमोर पेच निर्माण केला होता. दुसरीकडेस इशान किशन आणि केएल राहुलचं संघात असणं नसणंही चर्चेचा विषय ठरला आहे. केएल राहुलला टी20 फॉर्मेटमध्ये स्थान मिळणार की नाही? तर इशान किशनने दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून माघारी फिरला होता. त्याचबरोबर जितेश शर्माला टी20 वर्ल्डकपसाठी उमेदवार आहे. असं सर्व गणित असताना संजू सॅमनसाठी पाच महिने खूपच महत्त्वाचे आहेत. मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. कारण या मालिकेवर संजू सॅमसनचं टी20 वर्ल्डकपचं भवितव्य ठरणार आहे.
टी20 मालिकेनंतर आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व सुरु होणार आहे. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व संजू सॅमसन करणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली तर संजूचा नक्कीच टी20 वर्ल्डकपसाठी विचार केला जाईल. त्यामुळे संजू सॅमसनला या दोन स्पर्धा खूपच महत्त्वाच्या आहेत. कारण चार विकेटकीपर रेसमध्ये आहेत. त्यापैकी 15 खेळाडूंच्या चमूत दोघांचा विचार केला जाईल. त्यापैकी कोण दोन असतील हे आता कामगिरीवर निश्चित होणार आहे.
संजू सॅमसनची टी20 मालिकेत निवड झाल्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता संजू सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिल्या टी20 सामना 11 जानेवारीला होणार आहे.
अफगानिस्तान टी20 सीरीजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह , आवेश खान, मुकेश कुमार.