IND vs AFG | रोहित शर्मा- विराट कोहली 14 महिन्यांनी टी 20 टीममध्ये, वर्ल्ड कपमध्ये संधी?

Rohit Sharma And Virat Kohli | टीम इंडियाचे हुकमाचे एक्के अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे परतले आहेत. त्यामुळे टीम इंडियाची ताकद दुप्पटीने वाढली आहे.

IND vs AFG | रोहित शर्मा- विराट कोहली 14 महिन्यांनी टी 20 टीममध्ये, वर्ल्ड कपमध्ये संधी?
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 8:20 PM

मुंबई | अफगाणिस्तान विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं 14 महिन्यांनी कमबॅक झालं आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील या टी 20 सीरिजला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 17 जानेवारीला अखेरचा सामना पार पडणार आहे.

रोहित शर्माा आणि विराट कोहली या दोघांनी याआधी टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून हे दोघेही या टी 20 फॉर्मेटपासून दूर होते. मात्र आता आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठीच्या तयारीसाठी दोघांचं पुन्हा संघात पुनरागमन झालं आहे.

आयपीएल संपताच टी 20 वर्ल्ड कप 2024 ला सुरुवात होणार आहे. हा वर्ल्ड कप 1 ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी फार कमी वेळ आहे. या 5 महिन्यांच्या कालावधीत टीम इंडियाला मोजकेच टी 20 सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धची टी 20 मालिका फार महत्त्वाची आहे. टी 20 वर्ल्ड कप दृष्टीक्षेपात ठेवून बीसीसीआय निवड समितीने ही सर्व रणनिती केली आहे. मात्र त्यानंतरही विराट आणि रोहित या दोघांना वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार का, असा सवालही आता क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

रोहित आणि विराट परतले

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.