Video: राखी पौर्णिमेच्या दिवशी साराने अर्जुन तेंडुलकरकडून असं काही करून घेतलं, तुम्हीही हसाल

सारा तेंडुलकर आणि अर्जुन या भावंडांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखी पौर्णिमा असल्याने हा व्हिडीओ खास आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच वेगाने व्हायरल झाला आहे. या दोघांनी मिळून नेमकं काय केलं ते जाणून घ्या.

Video: राखी पौर्णिमेच्या दिवशी साराने अर्जुन तेंडुलकरकडून असं काही करून घेतलं, तुम्हीही हसाल
Video: राखी पौर्णिमेच्या दिवशी साराने अर्जुन तेंडुलकरकडून असं काही करून घेतलं, तुम्हीही हसाल
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 09, 2025 | 6:55 PM

सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर या बहीण भावाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहे. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर स्टायलिश फोटो आणि रील्ससाठी ओळखली जाते. पण साराने आज शेअर केलेला व्हिडीओ खूपच खास आहे. कारण रक्षाबंधन असल्याने हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडीओत सारा आणि अर्जुन एकत्र आहेत. यात सारा तेंडुलकरने अर्जुनकडून वेगळंच काम करवून घेतलं. त्यामुळे नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. ऐरव्ही अर्जुन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानात घाम गाळताना दिसतो. पण यावेळी अर्जुन तेंडुलकर क्रिकेटर नाही तर एक मेकअप आर्टिस्टच्या भूमिकेत दिसला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत साराने अर्जुनकडे मेकअप करण्यासाठी विचारणा केली. त्यानेही तिला होकार दिला. मेकअप ब्रश, लिपस्टिकपासून आयलाइनर वापरून अर्जुनने तिच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मेकअप कसा झाला ते तुम्हीच पाहा.

सारा तेंडुलकर रक्षाबंधनचं औचित्य साधून अर्जुनकडे गेली. सारा अर्जुनला म्हणाली की, चल… आज तू मला तयार कर. अर्जुनने देखील एक चांगला भाऊ म्हणून हे करायला होकार दिला. त्याने बहिणीचा मेकअप केला. सारा तेंडुलकर तिच्या धाकट्या भावाला मेकअप करताना पाहून खूप आनंदी झाली होती. अर्जुन मेकअप नीट करत नाही हे तिला माहीत होतं. पण इथे मेकअपबद्दल नाही तर प्रेमाचं नातं होतं. मेकअप पूर्ण झाल्यानंतर सारा म्हणाली की मला वाटले होते की तू यापेक्षाही वाईट मेकअप करशील.

व्हिडिओमध्ये दोघांमधील विनोद आणि प्रेमळ नाते स्पष्टपणे दिसून येते. साराने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की , ‘खोडकर जोडीकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा .’ सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने एखादी पोस्ट किंवा फोटो टाकला की त्याच्या बातम्या होतात. तसेच त्याखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. अर्जुन तेंडुलकर सध्या क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत करून आहे. दुसरीकडे, सारा अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे. अलिकडेच तिला ऑस्ट्रेलियामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे काम मिळाले आहे .