IND vs ENG | सरफराज खानचा वूडच्या बॉलिंगवर अजब शॉट, इंग्लंडच्या बॉलरची चिडचिड

Sarfaraz Khan and Mark Wood Video | सरफराज खान याने टीम इंडियासाठी निर्णायक क्षणी देवदत्त पडीक्कल याच्यासोबत भागीदारी केली. तसेच तिसरं अर्धशतक ठोकलं. सरफराजने या दरम्यान एक अफलातून शॉट मारला.

IND vs ENG | सरफराज खानचा वूडच्या बॉलिंगवर अजब शॉट, इंग्लंडच्या बॉलरची चिडचिड
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 4:48 PM

धर्मशाला | टीम इंडियाने आतापर्यंत इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या युवा शिलेदारांनी कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आपली छाप सोडली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. या दरम्यान टीम इंडियाकडून अनेक युवा खेळाडूंनी पदार्पणही केलं. त्यापैकी एक म्हणजे मुंबईकर सरफराज खान. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या सरफूने टीम इंडियातगी आपली छाप सोडली.

सरफराजने राजकोट कसोटीमधून पदार्पण केलं. सरफराजने या कसोटीतील दोन्ही डावांमध्ये अर्धशतकी खेळी केली. सरफराज रांचीमध्ये फ्लॉप ठरला. मात्र सरफराजने धर्मशालेतील पाचव्या कसोटीत पुन्हा एकदा धमाका केला. सरफराजने या दरम्यान इंग्लंडचा बॉलर मार्क वूड याला बॅटिंगने झोडून काढला. या दोघांमध्ये बॅट-बॉल सामना पाहायला मिळाला. सरफराजने या दरम्यान अफलातून शॉट मारत चौकार मिळवला.

हे सुद्धा वाचा

मार्क वूड टीम इंडियाच्या डावातील 76 वी ओव्हर टाकत होता. मार्कने या ओव्हरमधील एक बॉल जवळपास 150 किमी वेगाने टाकला. सरफराजने या बॉलवर चोख प्रत्युत्तर दिलं. सरफराजने शरीराच तोल सावरत विकेटकीपरच्या डोक्यावरुन कडक चौकार मारला. सरफराजचा हा फटका पाहून कॉमेंटटेर आकाश चोप्रा आणि ओवेस शाह हे दोघेही अवाक झाले. सरफराजच्या फटक्याला दोघांनी रॅम्प शॉट असं नाव दिलं.

सरफराजचा खानचा ‘वरचा क्लास’

सरफराजने त्यानंतर वूडच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये मिड विकेटच्या दिशेने पूल शॉट मारत सिक्स खेचला. हे काय मार्क वूडला पटलं नाही. सरफराजची फटकेबाजी पाहून मार्कचा तिळपापड झाला. त्यानंतर सरफराजने इंग्लंड विरुद्ध आणि कसोटी कारकीर्दीतील तिसरं अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान सरफराजच्या या शॉटचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.