SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : यास्तिका भाटीया एलबीडब्ल्यू, टीम इंडियाला तिसरा झटका
South Africa vs India, Womens T20 World Cup 2026 Live Score Updates: दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स या सामन्यातील प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

LIVE Cricket Score & Updates
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : यास्तिका भाटीया एलबीडब्ल्यू, टीम इंडियाला तिसरा झटका
भारताने तिसरी विकेट गमावली आहे. अयाबोंगा खाका हीने यास्तिका भाटीया हीला एलबीडब्ल्यु आऊट केलं. यास्तिकाने 13 बॉलमध्ये 3 फोरसह 15 रन्स केल्या. यास्तिका आऊट झाल्याने भारताचा स्कोअर 7.2 ओव्हरमध्ये 3 आऊट 67 असा झाला आहे.
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : स्मृतीनंतर शफाली आऊट, भारताची सलामी जोडी माघारी
दक्षिण आफ्रिकेने भारताला दुसरा झटका दिला आहे. स्मृती मंधाना हीच्यानंतर शफाली वर्मा आऊट झाली आहे. शफाली वर्मा हीने 15 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 31 रन्स केल्या. शबनीम इस्माईल हीने शफालीला आऊट केलं.
-
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : स्मृती मंधाना बोल्ड, भारताला पहिला झटका
भारताने आश्वासक सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मंधाना रचनात्मक शॉट मारण्याच्या प्रयत्ना मारिजान काप हीच्या बॉलिंगवर तिसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर बोल्ड झाली. स्मृतीने 12 बॉलमध्ये 17 रन्स केल्या.
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : सामन्याला सुरुवात, भारताची बॅटिंग, शफाली-स्मृती मैदानात
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी बॅटिंगसाठी मैदानात आली आहे. या दोघी भारताला कशी सुरुवात मिळवून देतात याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन :
लॉरा वोल्वार्ड्ट (कॅप्टन), ताझमिन ब्रिट्स, ॲनेरी डेर्कसेन, डेन व्हॅन निकेर्क, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन (विकेटकीपर), सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा.
-
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, श्री चरणी आणि नंदनी शर्मा.
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंगचा निर्णय
वुमन्स टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाज आता दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका सामना, थोड्याच वेळात टॉस
क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची प्रतिक्षा आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : दक्षिण आफ्रिका वुमन्स टीम इंडिया
लॉरा वोल्वार्ड्ट (कर्णधार), सुने लुस, अॅनेरी डर्कसेन, मारिझान काप, नॅडीन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, कायला रेनेके, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा, काराबो मेसो, तुमी सेखुखुने, तझमिन ब्रिट्स आणि डेन व्हॅन निकेर्क.
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, राधा यादव, भारती फुलमाळी आणि प्रेमा रवा.
-
SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान
वुमन्स टीम इंडिया वर्ल्ड कप 2026 मोहिमेतील आपला सलग तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र भारतासाठी हा विजय पहिल्या 2 सामन्यांच्या तुलनेत सोपा नसणार. भारतासमोर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा या सामन्यात कस लागणार आहे.
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 तगडे आमनेसामने आहेत. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना खेळवण्यात येत आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. दक्षिण आफ्रिकेने 2 पैकी 1 सामना जिंकलाय तर एकदा पराभूत व्हावं लागलंय. तर टीम इंडिया अजिंक्य आहे. त्यामुळे महिला ब्रिगेड सलग तिसरा सामना जिंकून विजयी हॅट्रिक पूर्ण करणार का? याची चाहत्यांना उत्सूकता आहे. या निमित्ताने सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.