T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

| Updated on: Oct 19, 2021 | 11:59 PM

स्कॉटलंडचा संघ विश्वचषकात उत्तम कामगिरी करत आहे. आधी बांग्लादेशला पराभूत केल्यानंतर आता त्याने पापुआ न्यू गिनी या संघालाही मात देत आपला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे.

1 / 5
टी20 वर्ल्ड कप 2021 ग्रुप स्टेजच्या सामन्यात  स्कॉटलंडचा खेळाडू  रिचर्ड बॅरिंगटन (richard_berrington) याने इतिहास रचला आहे.  पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध त्याने 49 चेंडूत 70 धावा करत अर्धशतक ठोकलं. त्यामुळे टी20 विश्वचषकात अर्धशतक ठोकणारा तो पहिला स्कॉटलंडचा खेळाडू ठरला आहे.

2 / 5
बॅरिंगटनने या डावात 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. यावेळी त्याचा  स्ट्राइक रेट 142.85 इतका होता. त्याने अतिशय महत्त्वाची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

3 / 5
सामन्यात बॅरिंगटनने मॅथ्यू क्रॉससोबत मिळून 65 चेंडूत 92 धावांची खेळी केली. ज्याच्या जोरावर संघाने 20 ओव्हरमध्ये 165 रन केले. ज्यानंतर पीएनजी संघ 148 धावांच करु शकल्याने स्कॉटलंडचा संघ 17 धावांनी जिंकला.

4 / 5
तर ही धमाकेदार खेळी करणारा रिचर्ड बॅरिंगटन याचा जन्म दक्षिण आफ्रीका येथे झाला. 14 वर्षाचा असताना तो  स्कॉटलंडला स्थायिक झाला. ज्यानंतर आधी अंडर-15 संघाकडून खेळल्यावर 2008 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्कॉटलंडकडून पदार्पण केलं.

5 / 5
दरम्यान रिचर्ड हा 18 वर्षाचा असताना आयसीसीच्या युरोपीय क्रिकेट अॅकेडमीकडून भारतात ट्रेनिंगसाठी आला होता. त्याने आतापर्यंत  वनडे आणि टी20 मध्ये 1-1 शतक लगावलं आहे.