AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा स्पॉन्सर नको रे बाबा..! सहारापासून ड्रीम 11 पर्यंत असे काही झाले कंपन्यांचे हाल

टीम इंडियाच्या जर्सीवर एखाद्या कंपनीचं नाव असणं ही गौरवाची बाब आहे. पण मागच्या काही वर्षात ज्या ज्या कंपन्या प्रायोजक झाल्या त्यांची स्थिती नाजूक झाली, अशी स्थिती आहे. हा निव्वल योगायोग आहे. पण आता धाकधूक लागून आहे.

टीम इंडियाचा स्पॉन्सर नको रे बाबा..! सहारापासून ड्रीम 11 पर्यंत असे काही झाले कंपन्यांचे हाल
| Updated on: Aug 25, 2025 | 4:42 PM
Share

भारत सरकारने एक विधेयक पास केलं आणि ऑनलाईन मनी गेमिंग अॅपचा बाजार उठला. यात भारतीय संघाला स्पॉन्सरशिप देणाऱ्या ड्रीम इलेव्हन कंपनीचं नावही आघाडीवर आहे. ड्रीम इलेव्हन कंपनीने 2023 मध्ये टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजकत्व घेतले. पण ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर बंदी घातल्यावर ड्रीम 11 कंपनीला धक्का बसला आहे. ड्रीम 11 कंपनीने टीम इंडियासोबत 358 कोटी रुपयांचा जर्सीचा करार केला होता. तसेच या कंपनीने इतर जाहिरातींवर 2400 कोटी खर्च केले होते. पण सरकारच्या निर्णयानंतर बीसीसीआयने ड्रीम 11 सोबतचा करार मोडला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी एएनआयला सांगितले की, आतापासून ते अशा कंपन्यांशी कोणताही करार करणार नाहीत, कारण आता हे काम नवीन कायद्यानुसार योग्य मानले जाणार नाही.  बीसीसीआयच्या जर्सी प्रायोजकत्वाची अशी स्थिती होण्याची ही काय पहिली वेळ नाही.  यापूर्वी देखील कंपन्यांची अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे स्पॉन्सरशिपबाबत सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहे.  2001 पासून आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीला प्रायोजित करणाऱ्या प्रत्येक कंपनीला कोणत्या ना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.

सहारा ही भारतातील दिग्गज कंपन्यांपैकी एक होती. एक काळ या कंपनीने भारतात गाजवला आहे. त्या काळात या कंपनीने टीम इंडियाला प्रायोजकत्व दिलं होतं. सहाराने 2001 ते 2013 पर्यंत टीम इंडियाच्या जर्सीला स्पॉन्सरशिप दिली होती. पण जसा काळ पुढे लोटला तशी कंपनीची स्थिती नाजूक झाली आणि अस्तित्व संपून गेलं. सहारानंतर मायक्रोमॅक्स स्मार्टफोन कंपनीने प्रायोजकत्व स्वीकारलं. मायक्रोमॅक्सने 2014 ते 2016 पर्यंत टीम इंडियाला जर्सी स्पॉनरशिप दिली. पण मायक्रोमॅक्स कंपनीची स्थिती नाजूक झाली आणि मार्केटमधून बाहेर गेली. बायूज कंपनीची स्थितीही अशीच काहीशी झाली. 2019 ते 2023 पर्यंत भारतीय संघाच्या जर्सीचं प्रायोजकत्व स्वीकारलं. पण आर्थिक अनियमितेतमुळे कंपनीला घरघर लागली.

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया कोण प्रायोजकत्व देत याची उत्सुकता आहे. कारण आता फारच कमी अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ही उत्सुकता ताणली गेली आहे.  क्रिकेट जर्सीवरील जाहिरातींसाठी एक मोठी बाजारपेठ आहे आणि अनेक कंपन्या त्यात रस घेतील, यात काही शंका नाही. पण कोणती कंपनी असेल याबाबत मात्र उत्सुकता आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा