AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahid afridi | शाहिद आफ्रिदीकडून सगळ्यांसमोर जावयाचा अपमान; शाहिन ऐवजी ‘या’ खेळाडूच कौतुक

Shahid afridi | भारतात वनडे वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप झाला. बाबर आजमने तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टनशिपचा राजीनामा दिला. शाहीन शाह आफ्रिदीला T20 टीमच कॅप्टन बनवण्यात आलं. आता शाहीनचे सासरे शाहीद आफ्रिदी यांनी वेगळीच भूमिका मांडलीय.

Shahid afridi | शाहिद आफ्रिदीकडून सगळ्यांसमोर जावयाचा अपमान; शाहिन ऐवजी 'या' खेळाडूच कौतुक
shahid afridi and Shaheen AfridiImage Credit source: AFP
| Updated on: Jan 01, 2024 | 11:20 AM
Share

लाहोर : वनडे वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये बरेच बदल पहायला मिळतायत. बाबर आजमने तिन्ही फॉर्मेटमध्ये नेतृत्व सोडलय. त्याच्याजागी शान मसूदला टेस्ट आणि शाहीन शाह आफ्रिदीला T20 टीमच कॅप्टन बनवण्यात आलय. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीम सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तीन टेस्ट मॅचची सीरीज सुरु आहे. या दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी शाहीनच्या नेतृत्वाबद्दल मोठी गोष्ट बोलून गेला.

शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सचा कॅप्टन आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आपल्या नेतृत्वाखाली टीमला किताब जिंकून दिलाय. आता त्याच्यावर पाकिस्तानच्या T20 टीमची जबाबदारी आहे. 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप होणार आहे, त्या दृष्टीने सुद्धा शाहीद आफ्रिदीच स्टेटमेंट महत्त्वाच आहे. शाहीन हा शाहीद आफ्रिदीचा जावय आहे.

हे काय बोलून गेला शाहिद आफ्रिदी?

शाहीद आफ्रिदी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. एका कार्यक्रमात सीनियर आफ्रिदीने जावई म्हणजे शाहीनच्या नेतृत्वाची नाही, तर मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वाच कौतुक केलं. रिजवानची मेहनत आणि फोकस यामुळे मी प्रभावित झालोय, असं शाहीद आफ्रिदी म्हणाला. रिजवानची सर्वात कुठली गोष्ट आवडते, ती म्हणजे तो खेळावर लक्ष देतो, असं आफ्रिदी म्हणाला. कोण काय करतय? याने त्याला अजिबात फरक पडत नाही. त्यानंतर शाहीद आफ्रिदी म्हणाला की, “मला रिजवानला पाकिस्तानच्या T20 टीमच कॅप्टन बनलेलं पहायच होतं, पण चुकून शाहीनला कॅप्टन बनवलं” तो मस्करीत असं बोलला.

जावयाबद्दल बोलताना शाहीद आफ्रिदी कधीच मागे पुढे नाही पाहत

शाहीनच लग्न शाहीद आफ्रिदीच्या मुलीसोबत झालय. दोघांमध्ये सासरा-जावयाच नातं आहे. शाहीद आफ्रिदी कधीच शाहीनवर टीका करताना मागे-पुढे पाहत नाही. शाहीनच्या नेतृत्वाबद्दल तो पहिल्यांदा असं बोललेला नाही. लाहोर कलंदर्सच्या टीमने शाहीनला कॅप्टन बनवलं, तेव्हा सुद्धा शाहीद आफ्रिदीने मतप्रदर्शन केलं होतं. कॅप्टन बनू नकोस, असा त्याने शाहीनला सल्ला  दिला होता. शाहीनने एक-दोन वर्ष कॅप्टनशिपपासून लांब राहून खेळावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं शाहीद आफ्रिदीच मत आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.