टीम इंडियाला धक्का! नितीश कुमार टी20 मालिकेतून आऊट, दोन वेळा शून्यावर बाद झालेला खेळाडू संघात

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डी संघातून आऊट झाला आहे.

टीम इंडियाला धक्का! नितीश कुमार टी20 मालिकेतून आऊट, दोन वेळा शून्यावर बाद झालेला खेळाडू संघात
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 25, 2025 | 6:07 PM

इंग्लंड विरुद्धची टी20 मालिका खिशात घालायची असेल तर दुसरा सामना निर्णायक ठरणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे. कारण फॉर्मात असलेला नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे या मालिकेतून आऊट झाला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, त्याला दुखापत झाल्याने या मालिकेला मुकणार आहे. त्याच्याऐवजी संघात रणजी स्पर्धेत फ्लॉप ठरलेल्या शिवम दुबेला संधी मिळाली आहे. जम्मू काश्मीरविरुद्धच्या सामन्यातील दोन्ही डावात शिवम दुबेला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. पण त्याची निवड संघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नितीश कुमार रेड्डीला साइड स्ट्रेन आहे. त्यामुळे काही आठवडे त्याला रिकव्हर होण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे त्याचं मालिकेत कमबॅक होणं कठीण दिसत आहे. त्याला दुखापत कधी आणि केव्हा झाली हे मात्र अस्पष्ट आहे. कोलकात्यात नितीश पहिला सामना खेळला होता. यावेळी त्याला गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची संधी मिळालीच नाही. त्यामुळे त्याला सरावादरम्यान दुखापत झाली असावी असा अंदाज आहे.

नितीश कुमार रेड्डी ऐवजी संघात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला संधी मिळाली आहे. पण शनिवारीच जम्मू काश्मीरविरुद्धचा सामना संपल्याने दुसऱ्या टी20साठी संघासोबत नसेल. 28 जानेवारीला होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यासाठी संघासोबत असेल. शिवम दुबेची संघात निवड झाल्याने क्रीडावर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण जम्मू काश्मीर विरूद्धच्या दोन्ही डावात त्याला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. त्यामुळे त्याचा फॉर्म आहे की नाही हा प्रश्न क्रीडाप्रेमी उपस्थित करत आहेत.

दुसरीकडे, शिवम दुबे टी20 वर्ल्डकप विजेत्या संघात होता. टीम इंडियाच्या विजयात त्याने मोलाचा हातभार लावला होता. त्यानंतर झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात शिवम दुबे खेळला होता. मात्र त्यानंतर झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत पाठीची दुखापत जाणवली होती. त्यामुळे काही दिवस क्रिकेट मैदानापासून दूर होता. दुखापतीतून सावरल्यानंतर सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत कमबॅक केलं. आता थेट इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुबेची निवड झाली आहे.