AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 8 महिन्यांत लोकप्रिय मालिका गुंडाळतेय गाशा’; मुख्य अभिनेत्री भावूक

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका वर्षभराच्या आतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याआधी दोन वेळा या मालिकेची वेळ बदलण्यात आली होती. त्यानंतर आता ती थेट बंद होणार असल्याचं कळतंय. या मालिकेतल्या मुख्य अभिनेत्रीची भावूक पोस्ट व्हायरल होत आहे.

अवघ्या 8 महिन्यांत लोकप्रिय मालिका गुंडाळतेय गाशा'; मुख्य अभिनेत्री भावूक
लोकप्रिय मालिका गुंडाळतेय गाशाImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 01, 2026 | 11:32 AM
Share

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका सुरू होतात आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार, टीआरपीनुसार त्या किती काळ चालणार हे ठरवलं जातं. काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतात. तर काही मालिकांना अवघ्या काही महिन्यांतच गाशा गुंडालावा लागतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेसोबत असंच काहीसं घडलं आहे. वर्ष पूर्ण होण्याआधीच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर या नवीन वर्षात ती नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यासोबतच एक लोकप्रिय मालिक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका येत्या 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे रेश्मा शिंदेच्या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. रेश्मा शिंदेची मालिका आता रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु रात्री 10.30 वाजता गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका प्रसारित केली जात होती. त्यामुळे या वेळी रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका दाखवण्यात येणार असल्याने ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही बंद होणार असल्याचं समजतंय. याविषयी आता गिरीजा प्रभूची पोस्टसुद्धा चर्चेत आली आहे.

गिरीजा प्रभूची पोस्ट-

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाजलेल्या मालिकेतील गाजलेली जोडी म्हणजेच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव हे ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र आले होते. ही मालिका 28 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली होती. यामध्ये त्यांनी यश आणि कावेरीची भूमिका साकारली होती.

ही मालिका जेव्हा सुरू झाली, तेव्हा रात्री 8 वाजता प्राइम टाइमला ती प्रसारित करण्यात येत होती. परंतु नंतर तिची वेळ बदलून रात्री 11 वाजता करण्यात आली. काही दिवसांनंतर पुन्हा मालिकेची वेळ बदलण्यात आली. 11 वरून ही वेळ रात्री 10.30 वाजता करण्यात आली होती. अखेर या मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच सेटवर कलाकारांनी शेवटचा दिवस साजरा केला. गिरीजा प्रभूने ‘माझ्याकडे शब्द नाहीत..’ असं म्हणत सोशल मीडियावर रडण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. या मालिकेत गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांच्यासोबतच सुकन्या मोने, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, वैभव मांगले, नंदिनी वैद्य यांच्याही भूमिका होत्या.

संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले
संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले.
उत्तर भारतीय महापौर... भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ अन्
उत्तर भारतीय महापौर... भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ अन्.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.