AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन लग्नात आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारलं अन्… कोणी केली धक्कादायक खुलासा..

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Wedding : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नात झालेला राडा... कोणाला केलेली लाथाबुक्क्यांनी मारहाण? धक्कादायक सत्य अनेक वर्षांनंतर अखेर समोर...

ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन लग्नात आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारलं अन्... कोणी केली धक्कादायक खुलासा..
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन
| Updated on: Jan 01, 2026 | 11:33 AM
Share

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Wedding : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहे. 2007 मध्ये अत्यंत खासगी पद्धतीत दोघांचं लग्न झालं. पण आजही दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु असते. एक काळ असा देखील होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. तेव्हा दोघांचा एक फोटो समोर आलेला, जो एका पापाराझीने क्लिक केला होता. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नात असं काही झालं होतं. ज्यामुळे पापाराझींनी संपूर्ण बच्चन कुटुंबाला बॅन केलं होतं… याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत एका पत्रकार महिलेने मोठा खुलासा केला आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नात पापाराझींना मारहाण देखील करण्यात आली होती. याच कारणामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबियांना बॅन करण्यात आलं होतं. याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वरिष्ठ पत्रकार हिना कुमावती यांनी मोठा खुलासा केला. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नात काय झालं होतं… याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

मुलाखतीत हिना कुमावती म्हणाल्या, ‘आम्ही ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न शूट करण्यासाठी गेलेलो… तीन दिवस आम्ही बच्चन कुटुंबियांच्या घरी गेलेलो… पण आम्हाला सेरिमनीची एकही झलक पाहता आली नाही… पण वरिंदर (पपाराजी वरिंदर चावला) यांनी नव वधू – वराच्या रुपात ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक फोटो घेतला होता..’

‘त्या क्षणानंतर आणि त्या फोटोने सर्वकाही बदललं… विशेषतः ब्रॉडकास्ट मीडियासाठी. तेव्हा आम्हाला कळकं की मोठ – मोठे कॅमेरे घेवून पळण्यात… फोटो कढण्यात काही अर्थ नाही. आता सर्वकाही प्रॅक्टिकल झालं आहे. वरिंदक यांनी त्यांच्या फोनने फोटो काढला होते आणि तेच फोटो व्हायरल देखील झाले. तो फोटो प्रत्येक न्यूज पेपर आणि प्रकाशनात प्रकाशित झाला होता. एक गोष्ट याठिकाणी मला सांगायची आहे आणि ती म्हणजे तेव्हापासूनच पापाराझी कल्चर उदयास आला…

अमर सिंगच्या सिक्योरिटीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचा तो फोटो काढणाऱ्या फोटग्राफ वरिंदर चावलासाठी हा क्षण खूप महागात पडला. कुमावती म्हणाल्या, ‘तिथे तैनात असलेल्या सिक्योरिटीने आमच्यासोबत वाईट वर्तन केलं… आम्हाला मारहाण करण्यात आली. अमर सिंह याची सिक्योरिटी होती. त्यांनी आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली… बंदुकीने देखील मारलं… त्या घटनेनंतर सर्व फोटोग्राफरने बच्चन कुटुंबियांना बॅन केलं होतं…’

पुढे कुमावती म्हणाल्या, ‘त्यानंतर जेव्हा बच्चन कुटुंब कोणत्या कार्यक्रमासाठी फोटोसाठी उभे राहायचे तेव्हा कोणताच फोटोग्राफर त्यांच्या कुटुंबाचे फोटो क्लिक नाही करायचे… काहीतरी बिनसलं आहे असं बच्चन कुटुंबाला कळालं… अखेर मॅरियट हॉटेलमध्ये सर्वांना बोलवण्यात आलं आणि पत्रकारांसोबत संवाद साधण्यात आला आणि माफी मागितली…. त्यानंतर बच्चन कुटुंबावरील बॅन हटवण्यात आला.’ असं देखील कुमावती म्हणाल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...