श्रेयस अय्यरच्या बहिणीने आता काय केलं? श्रेष्ठाच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाची टी20 क्रिकेटमध्ये हाराकिरी सुरूच आहे. आतापर्यंत एकाही टी20 सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. असं असताना टीकाकारांच्या रडारवर आला आहे. दुसरीकडे, बहिणीच्या कृतीमुळे त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

श्रेयस अय्यरच्या बहिणीने आता काय केलं? श्रेष्ठाच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ
श्रेयस अय्यरच्या बहिणीने आता काय केलं? श्रेष्ठाच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ
Image Credit source: INSTAGRAM
| Updated on: Jul 11, 2026 | 6:12 PM

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर भारतीय संघाची टी20 क्रिकेटमध्ये पराभवाची मालिका सुरू आहे. टी20 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवच्या हातून धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या दोन टी20 मालिकेत पराभव सहन करावा लागला आहे. आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही दारूण पराभव झाला आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी एकाही टी20 सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर टीकेची झोड उठली आहे. त्यात श्रेयस अय्यर आपल्याच विधानामुळे अडचणीत सापडत आहे. पण त्याची बहीण श्रेष्ठा अय्यरची विधानं आणि कृतीमुळे भारतीय संघाचा कर्णधार श्रेयसपुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टवर श्रेष्ठा अय्यर व्यक्त झाली आहे. त्यामुळे या वादाला फोडणी मिळाली आहे. यात टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीका करण्यात आली आहे.

भारतीय टी20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर अडचणीत असताना त्याच्या बहिणीने आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत श्रेष्ठाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मिळालेल्या पराभवाची तुलना विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनीसारख्या कर्णधारांसोबत केली होती. त्यामुळे आधीच वादाला फोडणी मिळाली होती. आता सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे वाद उफाळून आला आहे. इंस्टाग्रावर एका खात्यावरून एक पोस्ट केली गेली होती. त्यात श्रेयस अय्यर 10 सापांसोबत खेळत असल्याचं दाखवलं गेलं आहे. या पोस्टनुसार टीम इंडियाच्या श्रेयस अय्यर सोडून इतर खेळाडूंवर टीका केली आहे. या पोस्टनुसार संघातील इतर 10 खेळाडू श्रेयसला साथ देत नसल्याचं दाखवलं गेलं आहे.

श्रेष्ठा अय्यरने या पोस्टला लाईक केलं होतं. त्यामुळे आगीत तेल ओतलं गेलं. कारण लाईक करणं म्हणजेच त्या पोस्टचं समर्थन करणं असा अर्थ निघतो. पण वाद वाढत असल्याचं पाहून श्रेष्ठाने या पोस्टवरून लाईक हटवलं. म्हणजे ही पोस्ट अनलाइक केली. पण असं खरंच केलं हे सांगणं सध्या कठीण आहे. पण भावाची पाठराखण करण्यासाठी उतरलेल्या श्रेष्ठाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान पंजाब किंग्सशी निगडीत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावरून वाद झाल्यानंतर तिने तो काढला होता.

Follow Us