‘मी तीन वर्षांपासून..’ शुबमन गिलने रिलेशनशिपवर मौन सोडलं, सारासोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मोठा खुलासा

आयपीएल 2025 स्पर्धा सुरु आहे आणि शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने चांगली कामगिरी केली आहे. असं असताना शुबमन गिलने त्याच्या लव लाईफबाबत मोठा खुलासा केला आहे. मागच्या काही वर्षात शुबमनचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. मात्र आता त्याने त्याबाबत खरं काय ते सांगितलं.

मी तीन वर्षांपासून.. शुबमन गिलने रिलेशनशिपवर मौन सोडलं, सारासोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मोठा खुलासा
शुबमन गिल
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 26, 2025 | 5:13 PM

भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल क्रिकेटशिवाय इतर कारणांमुळे चर्चेत असतो. शुबमन गिलची क्रिकेटशिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा होत असते. शुबमन गिलचं नातं गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री असो की चर्चित चेहरे यांच्यासोबत जोडलं जातं.रिद्धिमा पंडित, अनन्या पांडे, सोनम बाजवा आणि अवनीत कौरसोबतही नाव जोडलं गेलं आहे. सारा तेंडुलकरसोबत असलेल्या मैत्रिमुळेही अनेक वावड्या उठल्या आहे. पण शुबमन गिल याबाबत कधी काही बोलला, ना कधी सारा…पण दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची चर्चा आहे. मात्र असं सर्व होत असताना शुबमन गिलने मोठा खुलासा केला आहे. शुबमन गिलने द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खरं काय ते सांगून टाकलं.

‘मी मागच्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असेल मी एकटा आहे. माझं नाव वेगवेगळ्या लोकांसोबत जोडलं जातं आणि या सर्व अफवा आहेत. कधी कधी त्याचा इतका त्रास होतो की, ज्या व्यक्तीला आयुष्यात कधी पाहीलं नाही. त्याच्याशी बोललो नाही. त्याच्यासोबत नाव जोडलं जातं. आता माझं लक्ष माझ्या प्रोफेशनल करिअरकडे आहे.’, असं शुबमन गिलने सांगितलं. यासह शुभमन गिलने सर्व अफवांना पूर्णविराम लावला आहे. तसेच त्याने स्पष्ट केलं की सिंगल आहे.

शुबमन गिल हा अवनीत कौरला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अवनीत आणि शुबमन गिल एकत्र मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसले होते. इतकंच काय तर अवनीतने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच अवनीतने क्रिकेट पाहण्यासाठी हजेरी लावली आहे.

शुबमन गिलची आयपीएल 2025 स्पर्धेत चांगली कामगिरी सुरु आहे. गुणतालिकेत गुजरात टायटन्स संघ टॉपला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच फक्त दोन सामने गमावले आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी गुजरातला फक्त दोन विजय आवश्यक आहेत. गिलने आतापर्यंतच्या सामन्यात 43.57 च्या सरासरीने 305 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.