
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 9 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 खेळाडू जाहीर करण्यात आले आहे. आता या पैकी कोणते 11 खेळाडू मैदानात उतरतील याबाबत उत्सुकता आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार आणि शुबमन गिल उपकर्णधार आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू प्लेइंग 11 मध्ये असतील यात काही शंका नाही. त्यामुळे शुबमन गिलसाठी कोणाला तरी बेंचवर बसण्याची पाळी येईल यात काही दुमत नाही. खरं तर शुबमन गिलमुळे भारताची ओपनिंग जोडीत बदल होईल. कारण शुबमन गिलसाठी तीच जागा योग्य दिसत आहे. चला जाणून घेऊयात प्लेइंग कशी असू शकते ती…
शुबमन गिल ओपनिंगला आला तर त्याच्यासोबत मैदानात अभिषेक शर्मा उतरणार आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असेल. त्यामुळे संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागू शकतं. टीम निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याकडे इशारा केला. आगरकर यांनी सांगितलं की, संजू सॅमसन यासाठी खेळत होता कारण की शुबमन गिल नव्हता. त्यामुळे शुबमन गिलचं संघात आगमन झाल्याने संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागू शकते.
तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा फलंदाजी करताना दिसू शकतो. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. पाचव्या क्रमांकावर जितेश शर्मा विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळेल. सहाव्या क्रमांकासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याची जागा निश्चित आहे. कारण त्याच्या रुपाने एक वेगवान गोलंदाजही संघाला मिळेल. दरम्यान, रिंकु सिंह हा बॅकअप प्लेयर असल्याचं अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मधून बाहेरच असेल. सातव्या क्रमांकावर अष्टपैलू अक्षर पटेल, आठव्या क्रमाकावर वरुण चक्रवर्ती, नवव्या क्रमांकावर कुलदीप यादव, दहाव्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग 11वा खेळाडू असेल.
आशिया कप स्पर्धेसाठी संभाव्य प्लेइंग 11 : शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह