व्हॅलेंटाईन वीकमध्ये सिंगल चांगलं वाटत नाही..! लाईव्ह सामन्यात सुरेश रैना काय बोलून गेला? Video Viral

जगभरात 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. या आठवड्याचा संदर्भ देत सुरेश रैनाने लाईव्ह समालोचन करताना एक उदाहरण दिलं. तेव्हा केएल राहुल फलंदाजी करत होता. त्याची ही कमेंट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हॅलेंटाईन वीकमध्ये सिंगल चांगलं वाटत नाही..! लाईव्ह सामन्यात सुरेश रैना काय बोलून गेला? Video Viral
| Updated on: Feb 14, 2025 | 3:10 PM

व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पण या दिवस येईपर्यंत व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. चॉकलेट डेपासून प्रॉमिस डे आणि या सप्ताहचा शेवट व्हॅलेंटाईन डेने होतो. या आठवड्यादरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा वनडे सामना पार पडला. हा सामना भारताने जिंकला पण सुरेश रैनाने या सामन्यादरम्यान जे काही बोलला ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. या सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत सुरेश रैना होता. केएल राहुल फलंदाजी करत होता. तेव्हा सुरेश रैनाने व्हॅलेंटाईन वीकचा संदर्भ देत कमेंट केली. त्याचा या प्रतिक्रियेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर डेथ ओव्हरमध्ये फलंदाजी करत होते. शेवटची पाच षटकं शिल्लक होती. 46 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर केएल राहुलने सिंगल धावा घेतली. त्यावर सुरेश रैनाने पटकन व्हॅलेंटाईन वीकचा संदर्भ देत प्रतिकिर्यी दिली.

‘चौकार आणि षटकार मारावे लागतील. डेथ ओव्हर्स सुरु आहेत. दोन सिंगल आल्या आहेत. तसं पण व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. सिंगल चांगलं वाटत नाही.’ असं सुरेश रैना म्हणाला. सुरेश रैनाच्या या उदाहरणामुळे सह समालोचक असलेला दीप दास गुप्ताही हसू आवरू शकला नाही. लाईव्ह सुरु असताना जोरजोरात हसू लागला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केएल राहुलने या सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली. त्याने 29 चेंडूत 137.93 च्या स्ट्राईक रेटने 40 धावा केल्या. यात त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला.

भारताने इंग्लंडसमोर सर्व गडी गमवून 356 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडचा संघ या धावांचा पाठलाग करताना 214 धावांवरच आटोपला. इंग्लंडने 34.2 षटकात सर्व गडी गमवून 214 धावा केल्या. यामुळे इंग्लंडचा 142 धावांनी पराभव झाला. भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकली. भारताने या विजयासह इंग्लंडला 14 वर्षांनी वनडे मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे.