SL vs AUS: स्टीव्हन स्मिथ इतिहास घडवण्यापासून 1 धाव दूर, सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक होणार!

Steven Smith Sachin Tendulkar : स्टीव्हन स्मिथ याला एका धावेसह 2 विक्रम करण्याची संधी आहे. स्टीव्हनला टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत करता आली नाही. मात्र आता स्टीव्हनची ही प्रतिक्षा संपणार आहे, असलं म्हटलं तर चूक ठरणार नाही.

SL vs AUS: स्टीव्हन स्मिथ इतिहास घडवण्यापासून 1 धाव दूर, सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक होणार!
steven smith test cricket australia
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 29, 2025 | 9:30 AM

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मायदेशात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने यासह 10 वर्षांनंतर बीजीटी ट्रॉफी जिंकली. त्यानतंर आता ऑस्ट्रेलिया नववर्षात श्रीलंका दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया श्रीलंका दौऱ्यात 2 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेला 29 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. स्टीव्हन स्मिथ याला या सामन्यात सचिन तेंडुलकर याचा महारेकॉर्ड ब्रेक करण्याची सधी आहे.

स्टीव्हन स्मिथ 1 धाव दूर

स्टीव्हनला गॉलमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिनचा महारेकॉर्ड उद्धवस्त करण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. स्टीव्हन स्मिथ याला कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांसाठी फक्त 1 रनची गरज आहे. स्टीव्हनला बीजीटीमध्ये ही कामगिरी करण्याची संधी होती. मात्र स्टीव्हन दुर्देवाने 1 धाव दूर राहिला. मात्र आता स्टीव्हन ही 1 धाव करण्यासाठी उत्सूक असणार, यात काडीमात्र शंका नाही.

स्टीव्हन स्मिथ श्रीलंकेविरुद्ध 1 धाव घेताच इतिहास घडवेल. स्टीव्हन 10 हजार कसोटी धावा करणारा एकूण 15 वा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरेल. ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत एलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग त्रिकुटाने ही कामगिरी केली आहे.

कसोटीत वेगवान 10 हजार धावा करणारे फलंदाज (सामनेनिहाय)

  1. ब्रायन लारा : 111
  2. कुमार संगकारा : 115
  3. यूनिस खान : 116
  4. रिकी पॉन्टिंग : 118
  5. जो रुट : 118
  6. राहुल द्रविड : 120
  7. सचिन तेंडुलकर : 122

सचिनला पछाडण्याची संधी

दरम्यान स्टीव्हन 1 धाव करताच सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक करेल आणि संगकाराच्या विक्रमाची बरोबरीही साधेल. स्टीव्हन कमीत कमी सामन्यांमध्ये 10 हजार धावा करणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरेल. तसेच सर्वात वेगवान 10 हजार कसोटी धावांचा विक्रम हा विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याच्या नावावर आहे. लाराने 111 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर सचिनला 10 हजार धावांसाठी 122 सामने खेळावे लागलेत. तर स्मिथच्या 114 सामन्यांमध्ये 9 हजार 999 धावा आहेत.

श्रीलंका टीम : धनंजया डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, ओशादा फर्नांडो, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, असिथा फर्नांडो, सदीरा वानरे, व्हॅन समरावी निशाण पेरीस, सोनल दिनुषा, लाहिरू उदारा आणि मिलन प्रियनाथ रथनायके.

ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), सॅम कोन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन मॅकस्विनी, टॉड मर्फी आणि कूपर कॉनोली.

Follow Us