SL vs ENG : इंग्लंडचा सामन्यासह मालिका विजय, श्रीलंकेचा फायनलमध्ये 53 धावांनी धुव्वा

Sri Lanka vs England 3rd ODI Match Result :इंग्लंडने हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात श्रीलंकेला सलग 2 सामन्यांमध्ये लोळवत मालिका जिंकली. हॅरी ब्रूक आणि जो रुट ही जोडी इंग्लंडच्या विजयाची शिल्पकार ठरली.

SL vs ENG : इंग्लंडचा सामन्यासह मालिका विजय, श्रीलंकेचा फायनलमध्ये 53 धावांनी धुव्वा
England Cricket Team
Image Credit source: England Cricket X Account
| Updated on: Jan 27, 2026 | 10:25 PM

इंग्लंड क्रिकेट टीमने श्रीलंकेवर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 53 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये जो रुट आणि हॅरी ब्रूक या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 358 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यजमान श्रीलंकेच्या फलंदाजांनीही विजयी धावांचा पाठलाग करताना जोर लावला. श्रीलंकेला विजयी करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे प्रयत्न अपुरे पडले. श्रीलंकेला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. इंग्लंडने श्रीलंकेला 46.4 ओव्हरमध्ये 304 रन्सवर गुंडाळलं. इंग्लंडने यासह सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका आपल्या नाववर केली. श्रीलंकेने या मालिकेत विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर पाहुण्या इंग्लंडने कमबॅक करत मालिकेवर नाव कोरलं.

इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामी जोडीला काही खास करता आलं नाही. रेहमान अहमद 24 तर बेन डकेट 7 धावांवर बाद झाले. मात्र त्यानंतर जो रुट आणि जेकब बेथल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 124 बॉलमध्ये 126 रन्सची पार्टनरशीप केली. जेकब बेथल आऊट झाल्याने ही भागीदारी मोडीत निघाली. जेकबने 65 धावा केल्या.

त्यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रूक या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 113 चेंडूत 191 धावांची नाबाद भागीदीरी केली. या दरम्यान दोघांनी शतकं झळकावली. रुटने 111 तर हॅरी ब्रूक याने 136 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

श्रीलंकेची बॅटिंग

श्रीलंकेची विजयी धावांचा पाठलाग करताना ठिकठाक सुरुवात झाली. पहिल्या 6 फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. त्यामुळे चाहत्यांना टफ फाईट पाहायला मिळाली. श्रीलंकेच्या फलंदाजांनी टीमला जिंकवण्यासाठी जोर लावला. मात्र अपवाद वगळता इतरांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. इंग्लंडने श्रीलंकेला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे श्रीलंकेचा 50 ओव्हरआधीच कार्यक्रम आटोपला.

इंग्लंडचा मालिका विजय

श्रीलंकेसाठी पवन रथनायके याने सर्वाधिक 121 धावा केल्या. ओपनर पाथुम निसांका याने 50 धावांचं योगदान दिलं. कामिल मिशारा, जनिथ लियानगे आणि दुनिल वेल्लालगे या तिघांनी प्रत्येकी 22-22 धावा केल्या. तर कुसल मेडीस याने 20 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना 20 पारही पोहचता आलं नाही. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटन, लियान डॉसन, विल जॅक्स आणि आदिल रशीद या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सॅम करन याने 1 विकेट मिळवली.