Joe Root : आणखी एक शतक, जो रुटचा धमाका सुरुच, ब्रायन लाराचा रेकॉर्ड ब्रेक

Joe Root Century : जो रुट याने श्रीलंकेविरुद्ध कोलंबोतील स्टेडियममध्ये तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात शतक झळकावलं. रुटने यासह ब्रायन लारा याचा रेकॉर्ड ब्रेक केला. जाणून घ्या रुटने शतकी खेळीसह आणखी काय काय विक्रम केले.

Joe Root : आणखी एक शतक, जो रुटचा धमाका सुरुच, ब्रायन लाराचा रेकॉर्ड ब्रेक
Joe Root Century
Image Credit source: @englandcricket X Account
| Updated on: Jan 27, 2026 | 7:12 PM

इंग्लंडचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज जो रुट याचा कसोटी क्रिकेटमध्ये एकतर्फी दबदबा आहे. रुटने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत कित्येत विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकं करणारा एकमेव सक्रीय फलंदाज आहे. रुटने कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. रुटने कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्येही हाच तडाखा कायम ठेवत धमाका केला आहे. रुटने आता सचिननंतर विंडीजचा माजी दिग्गज ब्रायन लारा याला मागे टाकलं आहे. रुटने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात चाबूक शतक झळकावलं आहे. रुटने या शतकासह खास कामगिरी केली आहे.

जो रुटचा शतकी तडाखा

रुटने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावलंय. रुटने 45 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर 1 रन घेतली. रुटने यासह 100 बॉलमध्ये एकदिवसीय कारकीर्दीतील 20 वं शतकं पूर्ण केलं. रुटने या शतकी खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. तसेच रुटने यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 61 वं शतक पूर्ण केलं. रुटने यासह वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ब्रायन लारा याला एकदिवसीय शतकांबाबत मागे टाकलं. लाराने वनडेत 19 शतकं झळकावली आहेत.

रुटची हॅटट्रिक

रुटची या मालिकेत 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही सलग आणि एकूण तिसरी वेळ ठरली. रुटने याआधीच्या पहिल्या दोन्ही सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

रुटच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7500 धावा पूर्ण

रुटने श्रीलंकेविरुद्ध एकूण आणि नाबाद 111 धावांची खेळी केली. रुटने यासह आणखी एक खास कामगिरी केली. रुटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार 500 धावापूर्ण केल्या. रुटने 189 सामन्यांमधील 178 डावांत ही कामगिरी केली. रुटने या दरम्यान 20 शतकं आणि 45 अर्धशतकं झळकावलीत. रुटने यासह त्याचा विक्रम आणखी मजबूत केला. रुटने वनडेत 7 हजार 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जो रुट इंग्लंडसाठी वनडेत 7 हजार धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.

मालिका रंगतदार स्थितीत

दरम्यान श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. अशात आता तिसऱ्या सामन्यात कोणता संघ सामन्यासह मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.