SL vs IND: श्रीलंका-इंडिया टी 20 मालिकेआधी मोठा झटका, 2 खेळाडू बाहेर, संधी कुणाला?

Sri Lanka vs India T20i Series: सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्याचा श्रीगणेशा करणार आहे. दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेने होणार आहे.

SL vs IND: श्रीलंका-इंडिया टी 20 मालिकेआधी मोठा झटका, 2 खेळाडू बाहेर, संधी कुणाला?
india and sri lanka flag
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 26, 2024 | 6:23 PM

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला 27 जुलैपासून टी 20 मालिकेने सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. मालिकेतील पहिला सामना हा शनिवारी 27 जुलैला पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांचं 2 नवे कर्णधार नेतृत्व करणार आहेत. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादवकडे टी 20 टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. तर चरिथ असलांका श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. यजमान श्रीलंका आणि टीम इंडिया दोन्ही संघ या मालिकेसाठी सज्ज आहेत. मात्र त्याआधीच या मालिकेतून 2 खेळाडू हे बाहेर पडले आहेत. त्यामुळे संघाची डोकेदुखी वाढली आहे.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा याला आजारपणामुळे मालिकेतून माघार घ्याली लागली. तर त्यानंतर नुवान तुषाराला बुधवारी सरावादरम्यान डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं. त्यामुळे नुवानला टी 20 मालिकेतून माघार घ्यावी लागली. मालिकेला काही दिवस असतानाच दोघेही बाहेर झाल्याने संघाला हा तगडा धक्का आहे. या दोघांच्या जागी बदली खेळाडूंची नाव जाहीर करण्यात आली आहेत. नुवान तुषारा याच्या जागी दिलशान मधुशंका आणि दुष्मंथा चमीराच्या जागी असिथा फर्नांडो याचा समावेश करण्यात आला आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

टी 20 मालिकेआधीच श्रीलंकेला 2 झटके

टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो

टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.