
आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेला 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे. त्याआधी प्रत्येक संघ जोरदार तयारी करत आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कपआधी अखेरच्या टी 20i मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात 5 टी 20i सामने होणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि श्रीलंका हे एकमेकांविरुद्ध वर्ल्ड कपआधी शेवटी टी 20i सीरिज खेळणार आहेत. पाकिस्तानने या सीरिजसाठी टीम जाहीर केली आहे.
पाकिस्तानने टी 20i मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. उभयसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. सलमान अली आगा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर अनुभवी ऑलराउंडर शादाब खान याचं संघात पुनरागमन झालं आहे. पाकिस्तानसाठी ही वर्ल्ड कपआधीची शेवटची मालिका फार महत्त्वाची आहे. मात्र या मालिकेत प्रमुख खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी 20i सीरिजसाठी प्रमुख खेळाडूंचा संघात समावेश केलेला नाही. या खेळाडूंमध्ये फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रउफ यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे हे 4 खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियातील बीबीएल अर्थात बीग बॅश लीग स्पर्धेत खेळत आहेत. त्यामुळे हे चौघे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग नसणार.
पाकिस्तान या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तसेच श्रीलंका टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेची सहयजमान आहेत. पाकिस्तानचे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे श्रीलंकेसाठी ही मालिका फार महत्त्वाची ठरणार आहे.
पहिला सामना, 7 जानेवारी, दाम्बुला
दुसरा सामना, 9 जानेवारी, दाम्बुला
तिसरा सामना, 11 जानेवारी, दाम्बुला
श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i सीरिजसाठी पाकिस्तान टीम : सलमान अली आगा (कॅप्टन), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा नफे, मोहम्मद नवाझ, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सॅम अयूब, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.