टी20 स्पर्धेत गोव्याची खेळी! अर्जुन तेंडुलकरला उतरवलं ओपनिंगला, 155 च्या स्ट्राईक रेट आणि घेतल्या 3 विकेट

अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळतो. गेल्या काही वर्षात त्याने गोव्यासाठी चांगली कामगिरी आहे. सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेतही त्याने चांगली कामगिरी केली.

टी20 स्पर्धेत गोव्याची खेळी! अर्जुन तेंडुलकरला उतरवलं ओपनिंगला, 155 च्या स्ट्राईक रेट आणि घेतल्या 3 विकेट
टी20 स्पर्धेत गोव्याची खेळी! अर्जुन तेंडुलकरला उतरवलं ओपनिंगला, 155 च्या स्ट्राईक रेट आणि घेतल्या 3 विकेट
Image Credit source: PTI
Updated on: Nov 28, 2025 | 10:00 PM

सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात गोवा आणि चंदीगड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा चंदीगडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोव्याने या सामन्यात 6 गडी गमवून 20 षटकात 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना चंदीगडने नांगी टाकली. अवघ्या 19 षटकात सर्व गडी गमवून 121 धावा केल्या. हा सामना गोव्याने 52 धावांनी जिंकला. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची खेळी महत्त्वाची ठरली. गोव्याने प्रथम फलंदाजी करताना इशान गडेकर आणि अर्जुन तेंडुलकर यांना ओपनिंगला उतरवलं. अर्जुनने ओपनिंगला उतरत फायदा घेतला आणि 3 चौकारांसह 9 चेंडू 14 धावा केल्या. पण दुर्दैवाने धावचीत होत तंबूत परतला. त्याचा आक्रमक पवित्रा पाहता आणखी काही धावा केल्या असता पण तसं झालं नाही. पण अर्जुनची अष्टपैलू खेळी गोव्याच्या विजयात मोलाची ठरली.

अर्जुन तेंडुलकर फलंदाजीत फार काही धावा करू शकला नाही. पण गोलंदाजीत त्याने 4 षटकं टाकली आणि फक्त 17 धावा देत 3 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 4.25 चा होता. त्याने पहिल्या दोन फलंदाजांना क्लिन बोल्ड केलं. चंदीगडचा कर्णधार शिवम भांभरीला त्रिफळाचीत केलं. त्यानंतर जगजीत सिंहला त्रिफळाचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. तर अर्जुन आझादला पायचीत केलं. अर्जुन तेंडुलकरने आपल्या स्पेलमध्ये चेंडू आता आणण्याची क्षमता सिद्ध करून दाखवली. त्यामुळे त्याला दोन विकेट मिळाल्या.

आयपीएलमध्ये ट्रेड विंडोच्या माध्यमातून अर्जुन तेंडुलकरला लखनौ सुपर जायंट्सने आपल्या संघात घेतलं आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील ट्रेड यशस्वी झाल्यानंतर आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. या संघाचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे आहे. त्यामुळे ऋषभच्या नेतृत्वात त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळते की नाही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अर्जुन तेंडुलकर आतापर्यंत 5 आयपीएल सामने खेळला आहे आणि तीन विकेट घेतल्या आहेत. तसेच 13 धावा केल्या आहे. मागच्या मुंबई इंडियन्स संघात होता. पण संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसून होता.