
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु आहे. अवघ्या दोन महिन्यात संघाची बांधणी करून मैदानात उतरणार आहेत. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार असून जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. असं असताना टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या फॉर्मात असल्याने आशा वाढल्या आहेत. कारण डावखुऱ्या फलंदाजाने मागच्या दोन वर्षात टी20 फॉर्मेटमध्ये आक्रमक खेळीने टीम इंडियाला विजयाच्या ट्रॅकवर आणलं आहे. पण अभिषेक वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आपण अष्टपैलू भूमिकेत असू असं दाखवून दिलं आहे. कारण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने ते सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा दोन्ही बाजूने योगदान देऊ शकतो. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने पुडुचेरीविरुद्ध सुरुवातीला आक्रमक खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत विकेटही काढल्या.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पंजाब संघाचं कर्णधार अभिषेक शर्माच्या खांद्यावर आहे. पुडुचेरीविरुद्ध प्रथम फलंदाजी आल्यानंतर अभिषेक शर्मा मैदानात उतरला. अभिषेक शर्मा मैदानात उतरला तर संघाचा भार हलका करून जातो ते खरं आहे. अभिषेक शर्मा या सामन्यात फक्त 9 चेंडू खेळला. पण त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारत 34 दावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 377.77 चा होता. अभिषेक शर्मा सामन्याच्या 15व्या चेंडूवर बाद झाला. पण तिथपर्यंत टीमला लय मिळवून दिली होती. त्याच्या आक्रमक खेळीनंतर इतर खेळाडूंनी धावांमध्ये भर घातली. संघाने 20 षटकात 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं.
अभिषेक शर्माने गोलंदाजीवेळी पहिलंच षटक हाती घेतलं. तसेच चौथ्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. पुढच्या षटकात आयुष गोयलने दोन विकेट काढल्या. तर वैयक्तिक तिसरं षटक टाकताना अभिषेक शर्माने दुसरी विकेट काढली. त्यानंतर पाचव्या षटक आणि त्याचं वैयक्तिक तिसरं टाकत त्याने पुडुचेरीचा कर्णधार अमन खानला बाद केलं. अभिषेक शर्माने एकूण 4 षटकं टाकली आणि 23 धावा देत 3 गडी बाद केले. पुडुचेरीचा संपूर्ण संघ 138 धावांवर बाद झाला. स्पर्धेतील गट टप्प्यातील पाच सामन्यांमधील पंजाबचा हा तिसरा विजय आहे. संघाला दोन पराभव पत्करावे लागले. सध्या, संघ एलिट गट क मध्ये बंगालच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे.