

स्मृती मंधाना हिची ICCनं 2021या वर्षातली सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठी नामांकन केलंय. स्मृती मंधाना हिला बुधवारी महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळालं होतं.

स्मृती मंधानानं 2021मध्ये मोठी कामगिरी केली. तिनं या वर्षी 2 कसोटीत 61च्या सरासरीनं 244 धावा केल्या आणि दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.


स्मृती मंधानाव्यतिरिक्त, आयसीसीनं टॅमी ब्युमॉन्ट, लिझी ली आणि गॅबी लुईस यांना वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी नामांकन दिलंय. अशा स्थितीत मंधानाला कडवी झुंज मिळणार आहे.