WIND vs WSA 2nd Odi: स्मृती मंधानाचा तडाखा, सलग दुसऱ्या शतकासह मोठ्या विक्रमाची बरोबरी

Smriti Mandgana Consecutive 2nd Century: स्मृती मंधानाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही विक्रमी शतक ठोकलं आहे.

WIND vs WSA 2nd Odi: स्मृती मंधानाचा तडाखा, सलग दुसऱ्या शतकासह मोठ्या विक्रमाची बरोबरी
smriti mandhana century
Image Credit source: smriti mandhana x account
| Updated on: Jun 19, 2024 | 4:41 PM

वूमन्स टीम इंडियाची ओपनर सांगलीकर स्मृती मंधाना हीने धमाका केला आहे. स्मृतीने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलग दुसरं शतक ठोकलं आहे. स्मृतीने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 39 व्या ओव्हरमध्ये शतक पूर्ण केलं. स्मृतीने 39 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सिंगल घेत शतक झळकावलं. स्मृतीने या शतकासह मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे एकूण सातवं शतक ठरलं. स्मृतीने यासह आपल्या माजी कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी साधली. स्मृतीने नक्की कोणत्या विक्रमाची बरोबरी केलीय, जाणून घेऊयात.

स्मृतीने 103 बॉलमध्ये 97.09 च्या स्ट्राईक रेटने 12 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. स्मृतीने यासह माजी कर्णधार मिथाली राज हीच्या टीम इंडियासाठी सर्वाधिक 7 वनडे सेंच्युरीचा विक्रमाची बरोबरी केली. मात्र स्मृतीने मिथालीपेक्षा खूप कमी डावात ही कामगिरी करु दाखवली. स्मृतीने 113 व्या डावात सातवं शतक ठोकलं. तर मिथालीला सातव्या शतकासाठी 211 व्या डावाची प्रतिक्षा करावी लागली होती. तर तिसऱ्या स्थानी विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर आहे. हरमनप्रीतने 113 डावांमध्ये 5 शतकं ठोकली आहेत.

स्मृतीला शतकानंतर आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र स्मृतीला आणखी काही वेळ घालवण्यात अपयश आलं. स्मृतीने शतकानंतर आणखी 36 धावा जोडल्या आणि आऊट झाली. स्मृतीने 120 बॉलमध्ये 136 धावांची खेळी केली. स्मृतीने 113.33 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. स्मृतीने या दरम्यान 18 चौकार आणि 2 षटकार लगावले. तसेच स्मृती आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी तिसऱ्या विकेट्ससाठी 171 धावांची विक्रमी भागीदारीही केली.

स्मृतीचं सलग दुसरं शतक


टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता,  जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना.

दक्षिण आफ्रिका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, नॉन्डुमिसो शांगासे, मिके डी रिडर (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा आणि अयाबोंगा खाका.