AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्याचा भाव पोहोचणार थेट 2 लाखांवर? 2026 सालाची मोठी भविष्यवाणी समोर!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी वर्षात सोन्याचा हाच भाव जवळपास दोन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Gold Rate : सोन्याचा भाव पोहोचणार थेट 2 लाखांवर? 2026 सालाची मोठी भविष्यवाणी समोर!
gold rate Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 18, 2025 | 5:32 PM
Share

Gold And Silver Rate : गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठे-चढउतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीआधी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत चांगलीच वाढली होती. दिवाळीनंतर मात्र सोने आणि चांदीचा भाव पडला. आता पुन्हा एकदा हे दोन्ही धातू चांगलेच चमकताना दिसत आहेत. चांदीच्या भावाने तर विक्रीम 2 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. दरम्यान, आता नव्या वर्षात सोने, चांदीची दिशा कोणती असेल? दोन्ही धातूंचा भाव वधारणार की किंमत कमी होणार? असे विचारले जात आहे. एक अंदाजानुसार तर सोन्याचा भाव थेट एक लाख 90 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

नेमका नवा अंदाज काय?

मिळालेल्या माहितीनुसार 2025 साली आतापर्यंत सोन्याच्या भावात साधारण 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही तेजी 2026 सालीदेखील कायम राहणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबतचा आता एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलचे सीईओ डेव्हिड टॅट यांनी 2026 या वर्षी सोन्याचा भाव सध्याच्या तुलनेत तब्बल 39 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे सांगितले आहे. हा अंदाज खरा ठरला तर जागतिक बाजारात सोन्याचा भाव 6 हजार डॉलरचा टप्पा पार करेल. भारतीय रुपयांत सांगायचे झाले तर सोन्याचा भाव थेट 1 लाख 90 रुपयांपर्यंत वाडण्याची शक्यता आहे.

सोन्यात अशी होऊ शकते वाढ

टॅट यांनी सांगितल्यानुसार सोने, चांदीचा भाव भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही. 2026 साली सोन्याचा भाव 6000 डॉलर्स प्रती औंस म्हणजेच 541,920 रुपये प्रति औंस (1.90 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम) रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

दरम्यान, बुधवारी सोन्याचा भाव 4,321 डॉलर्स प्रति औंसवर पोहोचला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा भाव 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीदेखील सोन्याचा भाव असाच वाढू शकतो, अशी शक्यता टॅट यांनी व्यक्त केली आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.