AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens T20 World Cup 2026 स्पर्धेआधी स्मृती मंधाना आऊट ऑफ फॉर्म, टीम इंडियाला टेन्शन

ICC Womens T20 World Cup 2026: भारतीय संघ खेळाडूंना परिस्थितीशी एकरुप होऊन जोरदार सराव व्हावा या हेतूने वेळेआधी इंग्लंडमध्ये पोहचली. मात्र स्मृती मंधाना हीला सराव आणि मुख्य सामन्यांमध्ये तिच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करणं जमलं नाही.

Womens T20 World Cup 2026 स्पर्धेआधी स्मृती मंधाना आऊट ऑफ फॉर्म, टीम इंडियाला टेन्शन
Smriti Mandhana Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 11, 2026 | 8:08 PM
Share

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला काही तास बाकी आहेत. टीम इंडिया या स्पर्धेत हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर उपकर्णधार म्हणून सांगलीकर स्मृती मंधाना ही जबाबदारी पार पाडणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 14 जून रोजी होणार आहे. मात्र या महामुकाबल्याआधीच स्मृतीच्या कामगिरीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. स्मृतीला इंग्लंडमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. स्मृतीला धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे स्मृतीची वर्ल्ड कप स्पर्धेतही अशीच स्थिती राहिली तर भारतीय संघ अडचणीत सापडू शकतो. स्मृतीला इंग्लंड दौरा आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. स्मृतीच्या धावा न होणं ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेआधी जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्देशाने टीम इंडिया आधीच इंग्लंडला पोहचली होती. मात्र स्मृती पहिल्याच सामन्यापासून अपयशी ठरली. स्मृतीला इसीबी डेव्हलपमेंट वुमन्स 11 टीम विरुद्ध ठीकठाक सुरुवात मिळाली. मात्र स्मृती या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरली. स्मृतीने या सामन्यात 21 धावा केल्या. त्यानंतर स्मृतीच्या कामगिरीत आणखी घसरण झालेली पाहायला मिळाली.

स्मृतीचे इंग्लंड विरुद्धचे आकडे

स्मृती इंग्लंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये भोपळा फोडण्यात अपयशी ठरली. स्मृतीने दुसऱ्या सामन्यातून जोरदार कमबॅक केलं. स्मृतीने दुसऱ्या सामन्यात 32 धावा केल्या. मात्र स्मृतीला अर्धशतकापर्यंत पोहचता आलं नाही. स्मृतीने पुन्हा तिसऱ्या सामन्यात निराशा केली. स्मृतीने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 8 धावा केल्या.

स्मृतीच्या 2 सराव सामन्यांत किती धावा?

स्मृतीने इंग्लंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत एकूण 40 धावा केल्या. त्यानंतर स्मृतीने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी सराव सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 39 धावा केल्या. मात्र स्मृतीने दुसऱ्या सामन्यात पुन्हा तोच कित्ता गिरवला. स्मृतीने इंग्लंड विरुद्ध सराव सामन्यात फक्त 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. अशाप्रकारे स्मृतीला इंग्लंडमध्ये सराव आणि मुख्या सामन्यांतील एकही डावात 40 हा आकडा गाठता आला नाही.

आता अवघ्या 2 दिवसांनंतर टीम इंडिया वर्ल्ड कप कप स्पर्धेतील आपला पहिला सामना 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे स्मृती पाकिस्तान विरुद्ध कमबॅक करणार की पुन्हा चाहत्यांची पदरी निराशा पडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर