Saurav Ganguly : विराट आणि रोहितच्या कामगिरीवर सौरव गांगुलींचं भाष्य, काय म्हणाले सौरव गांगुली?

बीसीसीआयचे अध्यक्ष सैरव गांगुली यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर भाष्य केलंय.

Saurav Ganguly : विराट आणि रोहितच्या कामगिरीवर सौरव गांगुलींचं भाष्य, काय म्हणाले सौरव गांगुली?
सौरव गांगुली, अध्यक्ष बीसीसीआय
Image Credit source: twitter
| Updated on: Apr 29, 2022 | 5:34 PM

मुंबई : विराट कोहली (Virat Kohali) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज खेळाडू आहेत. दोघेही आयपीएलमध्ये तरबेज खेळाडू म्हणूनच ओळखले जातात. काहींनी तर विराटला ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम म्हणून देखील रेट केलंय. मात्र, आयपीएलमध्ये विराट कोहली ज्या प्रकारे खेळत आहे. त्यावरुन त्याच्या कामगिरीवर चर्चा होतेय. आरसीबी संघाला त्याच्या फलंदाजीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. विराट कोहलीच्या खराब फलंदाजीचा मोठा फटका या संघाला बसला आहे. जरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी असले तरी या संघाकडून आणखी चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. तर मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर बोलतानना रोहित शर्माविषयी आणि दुसरीकडे आरसीबीवर बोलताना विराट कोहलीविषयी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी भाष्य केलंय.

सौवर गांगुली काय म्हणालेत?

सौरव गांगुली रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर बोलताना म्हणाले की, ‘रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही महान खेळाडू आहेत. मला खात्री आही की ते पुन्हा फॉर्ममध्ये येतीलच. मला आशा आहे की ते लवकरच धावा काढण्यास सुरुवात करतील. विराट कोहलीच्या डोक्यात काय चाललंय. हे मला माहित नाही पण मला खात्री आहे की तो पुन्हा चांगली कामगिरी करणार. काही चांगल्या धावाही काढणार. विराट एक महान खेळाडू आहे.’

उमरान मलिकचं कौतुक

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावेळी बोलताना उमरान मलिकचं कौतुक केलंय. ‘कोणताही संघ जिंकू शकतो किंवा कोणताही संघ हरू शकतो. खेळताना जय परायज होणारच. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये प्रत्येक खेळाडू चांगला खेळत आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ चांगली कामगिरी करत आहेत. उमरान मलिकची गोलंदाजी लक्षवेधी ठरली आहे. उमेश यादव आणि खलील अहमदनेही चांगली गोलंदाजी केली आहे. मी म्हणेन की उमरान मलिक हा आतापर्यंत लीगचा उत्कृष्ट चेहरा आहे.

मुंबई संघाबद्दल चिंता का?

इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा 15 वा सीजन आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सचा संघ खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. पाच वेळचा चॅम्पियन संघ अजूनपर्यंत एकही मॅच जिंकू शकलेला नाही. सलग 8 सामन्यात पराभव झाला आहे. यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या या कामगिरीनंतर एक मोठा निर्णय घेतलाय. यातच आता धवल कुलकर्णी हा मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडमध्ये दाखल झाला आहे.