AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा एक मोठा निर्णय, कॅमेंट्री बॉक्समध्ये बसणार खेळणार टीमकडून

मुंबई इंडियन्स संघाच्या या कामगिरीनंतर एक मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी धवल कुलकर्णीला मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडमध्ये दाखल केलंय.

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा एक मोठा निर्णय, कॅमेंट्री बॉक्समध्ये बसणार खेळणार टीमकडून
धवल कुलकर्णी आयपीएलच्या स्कॉडमध्ये दाखलImage Credit source: instagram
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 29, 2022 | 4:38 PM
Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा 15 वा सीजन आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. पाच वेळचा चॅम्पियन संघ अजूनपर्यंत एकही मॅच जिंकू शकलेला नाही. सलग 8 सामन्यात पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या या कामगिरीनंतर एक मोठा निर्णय घेतलाय. यातच आता धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) हा मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडमध्ये दाखल झाला आहे. धवल कुलकर्णी मागचे दोन सीजन मुंबई इंडियन्सचा भाग होता. पण यंदाच्या सीजनसाठी त्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं नव्हतं. धवलवर मुंबईच नाही, कुठल्याही संघाने बोली लावली नाही. मात्र, आता तो मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडमध्ये दाखल झालाय. धवल कुलकर्णीकडे आयपीएलचा मोठा अनुभव आहे. त्याने 92 सामन्यात 86 विकेट घेतलेत. तो राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स या संघांकडून खेळला आहे. मागच्या दोन वर्षात त्याला फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या सीजनमध्ये त्याच्यावर कोणी बोली लावली नाही.

कॅमेंट्री बॉक्समध्ये बसणार खेळणार टीमकडून

कशी गोलंदाजी करायची हे त्याला ठाऊक आहे

धवल कुलकर्णी आयपीएल 2022 मध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा धवलला संघात घेण्याबद्दल गंभीर होता. रोहितला धवल कुलकर्णी टीममध्ये हवा होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं होतं की धवलला संघात घ्यावं, अशी रोहितची इच्छा आहे. यामुळे मुंबईच्या गोलंदाजीला बळकटी येईल. धवल मूळचा मुंबईचा आहे. इथे आणि पुण्यात कशी गोलंदाजी करायची? हे त्याला चांगलं ठाऊक आहे.

मुंबईच्या गोलंदाजांचा इकॉनमी रेट जाणून घ्या

मुंबईने आतापर्यंत आठ सामने गमावलेत. त्याचं मुख्य कारण आहे, गोलंदाजी. इतर संघांच्या तुलनेत मुंबईची गोलंदाजी खूपच कमकुवत आहे. जसप्रीत बुमराह सोडल्यास मुंबईचा दुसरा एकही गोलंदाज चांगली कामगिरी करु शकलेला नाही. बासिल थंपीचा प्रति षटक इकॉनमी रेट 9.50 आहे. टायमल मिल्स 11.17 च्या इकॉनमी रेटने धावा लुटवतोय. डॅनियल सॅम्सचा प्रति षटक इकॉनमी रेट 13 आहे. एकवेळ मुंबईची गोलंदाजी मजबूत मानली जायची. पण आता तेच गोलंदाज संघर्ष करत आहेत.

धवल आयपीएलमध्ये किती सामने खेळलाय?

धवल कुलकर्णीकडे आयपीएलचा मोठा अनुभव आहे. त्याने 92 सामन्यात 86 विकेट घेतलेत. तो राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स या संघांकडून खेळला आहे. मागच्या दोन वर्षात त्याला फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या सीजनमध्ये त्याच्यावर कोणी बोली लावली नाही. म्हणून त्याने कॉमेंट्रीमध्ये नवी इनिंग सुरु केली. पण आता धवल कुलकर्णी मैदानावर खेळणार आहे. धवल दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करु शकतो.

Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा