जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने पहिल्यांदाच केलं भाष्य

टिम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यानंतर कुटुंबियांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर पहिल्यांदाच सौरव गांगुली याने भाष्य केलं आहे.

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने पहिल्यांदाच केलं भाष्य
जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने पहिल्यांदाच केलं भाष्य, कटामागे कोण ते सांगून टाकलं
Image Credit source: video grab
| Updated on: Aug 14, 2026 | 9:33 PM

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इतकंच काय तर कुटुंबियांनाही संपवण्याची आक्रमक भाषा त्या पत्रात केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गांगुली कुटुंबियांनी थेट पोलिसात धाव घेतली होती. तसेच नेमका काय प्रकार घडला याबाबत सांगितलं होतं. असं असताना या प्रकरणानंतर माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आला. त्याने कथित प्रकरणावर आपलं म्हणणं मांडत सांगितलं की, यापूर्वी असे प्रकार घडले आहेत आणि कालांतराने त्यावर पडदा पडला आहे. त्यामुळे आताही तसंच होईल. या प्रकरणी एक औपचारिक तक्रार पोलिसात दाखल केली आहे.

सौरव गांगुली आणि पत्नीला मिळाल्या धमक्या

पोलीस तपासानुसार, सीएबीच्या अधिकृत पत्त्यावर दोन पार्सल पाठवण्यात आले होते. ती पाकिटं उडल्यानंतर इंग्रजीमध्ये लिहिलेलं धमकीचं पत्र होतं. यात सौरव गांगुली, त्यांची पत्नी डोना गांगुली आणि त्यांच्या स्टाफला मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात आक्रमक भाषेचा वापर केला होता. त्यामुळे गांगुली कुटुंबियांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. सौरव गांगुली याने या प्रकरणी सांगितलं की, एका स्थानिक फोन नंबरवरून धमकीचा फोन आला होता. ही माहिती तपास यंत्रणांना दिली आहे. पोलीस तपास करत असून कठोर कारवाई करतील. सौरव गांगुली यांनी पुढे स्पष्ट केलं की, त्यांच्यासोबत पुरेशी सुरक्षा व्यवस्था असून घाबरण्याची गरज नाही.

गांगुली कुटुंबियांना गेल्या सहा महिन्यांपासून संशयित पत्र मिळत होती. सुरूवातीला माथेफिरू चाहत्याकडून असं होत असावं असं वाटलं. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण हा प्रकार वारंवार सुरू असल्याने गांगुली कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us