Cricket : वनडे-टी 20i सीरिजसाठी टीम जाहीर, या खेळाडूंना संधी

T20I And Odi Squad : दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20i आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या दोन्ही मालिकेतून संघातील अनुभवी खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे.

Cricket : वनडे-टी 20i सीरिजसाठी टीम जाहीर, या खेळाडूंना संधी
Virat Kohli and Kagiso Rabada
Image Credit source: Bcci
| Updated on: Jul 24, 2025 | 9:08 PM

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20iआणि वनडे मालिका खेळणार आहे. दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. एकदिवसीय मालिकेत टेम्बा बावुमा आणि टी 20i सीरिजमध्ये एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. एडन मारक्रम याला ट्राय सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली होती. तर टेम्बा बावुमा याचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर कमबॅक झालं आहे.

अनुभवी खेळाडूंचं कमबॅक

“वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप फायनलनंतर संघात अनेक अनुभवी खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. या खेळाडूंचा अनुभव संघासाठी बहुमूल्य आहेत. आमचा दोन्ही प्रकारात 2 भक्कम संघ तयार करण्याचा मानस आहे. आतापासून प्रत्येक मालिका आगामी टी 20 वर्ल्ड कप आणि 2027 मध्ये मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौरा कधीच सोपा नसतो. ऑस्ट्रेलियात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर आमची परीक्षा असेल”, असं दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी म्हटलं.

प्रेनेलन सुब्रायन याला पहिल्यांदाच संधी

प्रेनेलन सुब्रायन याला पहिल्यांदाच एकदिवसीय आणि टी 20i संघात संधी देण्यात आली आहे. प्रेनेलन याने झिंबाब्वे विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. प्रेनेलन याने झिंबाब्वे विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच लुआन-ड्रे प्रीटोरियस टी 20i मध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे लुआनचा वनडे आणि टी 20i मालिकेत समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 2 मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेकडून संघ जाहीर

टी 20i मालिकेपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात

दक्षिण आफ्रिकेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी 20i मालिकेने होणार आहे. उभयसंघात 10 ते 16 ऑगस्टदरम्यान एकूण 3 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर 16 ते 24 ऑगस्टदरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ : एडन मारक्रम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, नंद्रे बर्गर, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, नकाबा पीटर, लुआन-ड्रे प्रीटोरियस, कगिसो रबाडा, रियान रिकेलटन, ट्रिस्टन स्टब्स, प्रेनेलन सुब्रायन आणि रासी वॅन डेर डूसन.

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टन), कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, टोनी डी जोरजी, एडन माक्ररम, सेनुरन मुथुसामी, केशव महाराज, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, लुआन-ड्रे प्रीटोरियस, कगिसो रबाडा, रयान रिकेलटन, ट्रिस्टन स्टब्स आणि प्रेनेलन सुब्रायन.