
मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 ला आता काही दिवस बाकी असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. क्रीडा प्रेमींना कधी एकदा वर्ल्ड कप सुरू होतो असं झालं आहे. वर्ल्डकपच्या थराराला सुरूवात होण्याआधी जवळपास आता सर्व संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली असून संघाचा कर्णधार सुरूवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. वर्ल्ड कप सोडून कर्णधार घरी गेल्याने क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
वर्ल्ड कपच्या थराराला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. वर्ल्ड कपचे साखळी फेरीतील सामने सुरू होण्याधी सराव सामने होणार आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारतीय संघाकडे असून बीसीसीआयने जंगी तयारी केली आहे. वर्ल्ड कपच्या सामन्यांसाठी सर्वा चोख व्यवस्था केली आहे. जगभरातील संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र अचानक दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा माघारी मायदेशी परतला आहे.
टेम्बा बावुमा आणि आफ्रिकेचा संघ 25 ऑक्टोबरला भारतामध्ये दाखल झाला होता. मात्र दोन दिवसातच कौटुंबिक कारणास्तव त्याला घरी जायला लागल्याची माहिती समजत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघाचा पहिला सराव सामना अफगाणिस्तानविरूद्ध 29 सप्टेबर आणि दुसरा सराव सामना 2 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
दरम्यान, टेम्बा बावुमा याच्या गैरहजेरीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधारपदाची धुरा एडन मार्करम याच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
टेम्बा बावुमा( कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, रॅसी व्हॅन डर डुसेन, मार्को जॅन्सेन, अँडिले फेहलुकवायो, क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, टॅब्राझ विल्यम्स, लिबार्ड्स.