आधी दमदार फलंदाजी, मग भेदक गोलंदाजी, इंग्लंडमध्ये ‘या’ खेळाडूने 5 चेंडूत घेतले 4 विकेट

| Updated on: Aug 12, 2021 | 5:44 PM

या अष्टपैलू खेळाडूने फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर गोलंदाजी करतानाही प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो केलं. हॅट्रिक घेत चार विकेट पटकावल्या.

आधी दमदार फलंदाजी, मग भेदक गोलंदाजी, इंग्लंडमध्ये या खेळाडूने 5 चेंडूत घेतले 4 विकेट
Follow us on

लंडन :  क्रिकेटच्या इतिहासात बरेच असे खेळाडू आहेत. ज्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही प्रकारात आपल्या अनोख्या खेळाची छाप सोडली आहे. एकाच सामन्यात दोन्ही कामगिरी पार पाडत त्यांनी संघाला विजय मिळवून दिला आहे. असाच एक खेळाडू ज्याने 50 च्या सरासरीने रन बनवत बोलिंगमध्ये हॅट्रिक अशी दुहेरी कामगिरी केली होती. आज त्याचा वाढदिवस असून 12 ऑगस्टलाच त्याचा जन्म झाला होता. एडी बारलो (Eddie Barlow) असं या अष्टपैलू खेळाडूच नाव असून तो दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमकडून (South Africa Cricket Team) खेळायचा.

एडी बारलो यांचा जन्म 1940 साली 12 ऑगस्ट रोजी झाला होता. एडी यांनी आपल्या कारकिर्दीत टेस्‍ट क्रिकेटमध्ये 45.74 च्या सरासरीने रन केले. ज्यात सात शतकांचाही समावेश आहे. तसेच गोलंदाजीत त्यांनी 40 फलंदाजाना तंबूत धाडलं होतं. एडी यांच्याबद्दल एक आणखी खास गोष्ट म्हणजे ते सुरुवातीच्या काळातील काही ठरावीक चष्मा लावून खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहेत.

43 शतकं आणि 571 विकेट्स

एडी बारलो यांनी इंग्‍लंड विरुद्ध एका सामन्यात इतिहास रचला होता. 1970 साली रेस्‍ट ऑफ वर्ल्‍ड संघासोबत खेळताना एडी यांनी हेडिंग्‍लेमध्ये अप्रतिम प्रदर्शन केलं होतं. एडी यांनी पाच चेंडूत हॅट्रिकसह चार विकेट्स घेतल्या होत्या. एडी यांनी दक्षिण आफ्रिका संघाकडून 30 कसोटी सामन्यांत 45.74 च्या सरासरीने 2 हजार 516 रन बनवले. ज्यात 6 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.  टेस्‍ट क्रिकेटमध्ये त्यांनी 40 विकेट्सही घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी सामन्यांचा विचार करता एडी यांनी 283 सामन्यात 39.16 च्या सरीसरीने 18 हजार 212 धावा केल्या आहेत. यावेळी त्यांनी 43 शतक आणि 86 अर्धशतकं ठोकली. तसेच  571 विकेटेसही खिशात टाकले आहेत.

हे ही वाचा

इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेतला तीन दिग्गजांनी संन्यास, भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षकाचा समावेश 

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

(south africa Cricketer eddie barlow birthday on this day)