
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात बी ग्रुपमधील दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानसमोर 316 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 315 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एकाने शतक झळकावलं. तर तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर इतरांनाही योगदान देत संघाला 300 पार पोहचवलं. हेन्रिक क्लासेनशिवाय मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने शानदारपणे अफगाणिस्तानविरुद्ध बॅटिंग केली. आता दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज अफगाणिस्तानसमोर कशी कामगिरी करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. तसेच अफगाणिस्तानचे फलंदाज हे आव्हान पूर्ण करत विजयी सलामी देतात की दक्षिण आफ्रिका तसं करण्यापासून रोखणार, याकडेही क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी रायन रिकेल्टन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रायने 106 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारासह 103 धावा केल्या. तर कॅप्टन टेम्बा बावुमा, रॅसी व्हॅन डर डुसेन आणि एडन मारक्रम या तिघांनी प्रत्येकी अर्धशतकी खेळी केली. टेम्बा बावुमा याने 76 बॉलमध्ये 5 फोरसह 58 रन्स केल्या. तर रॅसी व्हॅन डर डुसेन आणि एडन मारक्रम या दोघांनी प्रत्येकी 52 धावा केल्या. तर टोनी डी झोर्झी, डेव्हिड मिलर आणि विआन मुल्डर या तिघांनी अनुक्रमे 11, 14 आणि 12 धावा केल्या. तर अफगाणिस्तानसाठी मोहम्मद नबी याने दोघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर फझलहक फारुकी, अझमतुल्लाह ओमरझई आणि नूर अहमद या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
अफगाणिस्तानसमोर 316 धावांचं आव्हान
🔄 Change of Innings 🔄
Consistent contributions throughout the batting lineup build a total of 315 runs after 50 overs for South Africa 👏🏏🔥🇿🇦💪.#WozaNawe #BePartOfIt #ChampionsTrophy #AFGvSA pic.twitter.com/gEXzRRQ15d
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 21, 2025
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदीकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, फजलहक फारूकी आणि नूर अहमद.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कॅप्टन), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.