AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटच्या जागी नेतृत्वाची संधी, भारताचा 34 वा टेस्ट कॅप्टन केएल राहुलची पहिली प्रतिक्रिया

राहुलला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी संघ व्यवस्थापनाच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले आहे, तर काहींनी विराटच्या नसण्याचा संघाला फटका बसेल असे म्हटले आहे.

विराटच्या जागी नेतृत्वाची संधी, भारताचा 34 वा टेस्ट कॅप्टन केएल राहुलची पहिली प्रतिक्रिया
सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने दमदार प्रदर्शन केलं आहे. फक्त तीन विकेट गमावून 272 धावा केल्या आहेत. यात राहुलचे नाबाद शतक आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकाचा समावेश आहे. मयांक आणि राहुलच्या खेळीने मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने पाया रचला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावा केल्या.
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 3:14 PM
Share

जोहान्सबर्ग: नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पाठिच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळत नाहीय. त्यामुळे विराटच्याजागी उपकर्णधार केएल राहुलकडे (KL Rahul) नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जोहान्सबर्गच्या दुसऱ्या कसोटीत राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिकेतील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी लोकेश राहुललाच कर्णधार बनवण्यात आले आहे. आता राहुलला कसोटीमध्ये सुद्धा नेतृत्व गुण दाखवण्याची संधी मिळाली आहे. केएल राहुल भारताचा 34 वा कसोटी कर्णधार आहे. (South Africa vs India KL Rahul becomes Indias 34th Test captain First reaction After Test captain)

कर्नाटकातून आलेला चौथा टेस्ट कॅप्टन राहुल हा कर्नाटकातून आलेला भारताचा चौथा कसोटी कर्णधार आहे. राहुलच्याआधी गुंडाप्पा विश्वनाथ, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे या कर्नाटकाच्या क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

राहुल म्हणाला… “प्रत्येक भारतीय खेळाडूचे देशाचे कर्णधारपद भूषवण्याचे स्वप्न असते. मी याकेड चांगली संधी म्हणून पाहत आहे” असे राहुलने सांगितले. विराट पाठिच्या दुखण्याने त्रस्त असल्याचे त्याने सांगितले. “चांगल्या धावा करुन प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. विराटच्या जागी हनुमा विहारीला संघात स्थान दिले आहे. त्याशिवाय कुठलाही बदल केलेला नाही” असे राहुलने सांगितले.

राहुलला कॅप्टन करण्यावर फॅन्स म्हणाले… राहुलला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी संघ व्यवस्थापनाच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले आहे, तर काहींनी विराटच्या नसण्याचा संघाला फटका बसेल असे म्हटले आहे. भारताने कर्णधार बदलल्याची आम्ही चिंता करत नाही, असे दक्षिण आफ्रिकन कॅप्टन डीन एल्गरने म्हटले आहे. मला चिंता वाटत नाही असे एल्गनरने सांगितले. क्विंटन डि कॉकच्या जागी संघात कार्ल वेरेनचा समावेश केला आहे.

संबंधित बातम्या: 

येवल्यात विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीन ऐवजी दिली कोविशील्ड लस; नमनाचा नारळ गोंधळाने फुटला…! नितीन गडकरींनी जाहीर कार्यक्रमात अनिल देशमुखांचे मानले आभार; कारण काय? फिक्स खासदार, भावी खासदार, जालन्यात अर्जुन खोतकरांसाठी बॅनरबाजी, 2024 मध्ये दानवेंना आव्हान देण्याची तयारी?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.