Asin Games 2023 | एशियन गेम्ससाठी Sri Lanka क्रिकेट टीमची घोषणा

Sri Lanka Cricket Board | श्रीलंका क्रिकेट टीमने महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतलाय.

Asin Games 2023 | एशियन गेम्ससाठी Sri Lanka क्रिकेट टीमची घोषणा
| Updated on: Sep 18, 2023 | 5:55 PM

कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट टीमने मुख्य गोलंदाजांच्या अनुपस्थितीतही शानदार कामगिरी केली. श्रीलंकेने साखळी आणि सुपर 4 मध्ये विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता फायनल मॅचसाठी दोन्ही संघ सज्ज होते. टॉसही श्रीलंकेच्या बाजूने गेला. कॅप्टन दासून शनाका याने पहिले बॅटिंग करुन टीम इंडियाला चेसिंग करण्यासाठी भाग पाडायचं ठरवलं. पण झालं उलटचं. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

मोहम्मद सिराज याने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. सिराजने यासह लंकादहन केलं. मोहम्मद सिराज याने 7 ओव्हरमध्ये 6 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या याने 3 विकेट्स घेत श्रीलंकेचं कंबरडं मोडलं. तर जसप्रीत बुमराह याने 1 विकेट सिराज आणि हार्दिकला चांगली साथ दिली. या तिघांनी श्रीलंकेला अवघ्या 50 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 51 धावांचं फुसकं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. श्रीलंका टीमने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली अन् ऐन महत्त्वाच्या सामन्यात माती केली.

हा सामना अवघ्या काही तासांमध्येच आटोपला. श्रीलंकेचे क्रिकेट चाहते मोठ्या उत्सुकतेने सामना पाहण्यासाठी मैदानात आले होते. तर काही चाहते सामन्यादरम्यानही तिकीटासाठी रांगेत होते. मात्र तिकीट मिळेपर्यंत इथे सामनाच संपला. श्रीलंकेचं सलग दुसऱ्यांदा आशिया कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. मात्र त्यांनी मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीतही लाजबाव कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. आता श्रीलंकेच्या पराभवानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

अवघ्या काही दिवसांनी एशियन गेम्स 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या एशियन गेम्स स्पर्धेसाठी टीम इंडिया, पाकिस्ताननंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मेन्स आणि वूमन्स टीमची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मेन्स आणि वूमन्स टीममध्ये प्रत्येकी 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. श्रीलंका क्रिकेट टीमने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. सहान अरचिगे हा मेन्स टीमचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर चमारी अथापाथ्थु ही वूमन्स टीमची कॅप्टन आहे.

एशियन गेम्ससाठी श्रीलंका टीम

एशियन गेम्ससाठी मेन्स श्रीलंका क्रिकेट टीम | सहान अरचिगे (कॅप्टन), लसिथ क्रोसपुल्ले, शेवोन डॅनियल, अशेन बंदारा, अहान विक्रमसिंघे, लाहिरू उदारा (डब्ल्यूके), रविंदू फर्नांडो, रानिथा लियानारच्ची, नुवानिडू फर्नांडो, सचिथा जयतिलाका, विजयकांत व्यासकांत, निमेश विमुक्ता, विमुक्ता, लाहिरू ठुरा, लाहिरु उदारा आणि लसिथ क्रोसपुल्ले.

एशियन गेम्ससाठी वूमन्स श्रीलंका क्रिकेट टीम | चमारी अथापाथ्थु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, विश्मी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहरी, इमेशा दुलानी, अनुष्का संजीवनी, ओशादी रणसिंघे, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, उदेशिका प्रबोधनी, हसिनी परेरा, कौशीनी नुथ्यांगणा,अचिनि कुलासुरिया आणि इनोशी फर्नांडो.