Asia cup 2026: वुमन्स टी20 आशिया कपसाठी श्रीलंकन संघाची घोषणा, विहंगाला मिळाली पहिल्यांदाच संधी

वुमन्स टी20 आशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेसाठी भारताने आधीच संघ जाहीर केला आहे. आता या स्पर्धेला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना श्रीलंकेने संघ जाहीर केला आहे.

Asia cup 2026: वुमन्स टी20 आशिया कपसाठी श्रीलंकन संघाची घोषणा, विहंगाला मिळाली पहिल्यांदाच संधी
Asia cup 2026: वुमन्स टी20 आशिया कपसाठी श्रीलंकन संघाची घोषणा, विहंगाला मिळाली पहिल्यांदाच संधी
Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Aug 13, 2026 | 8:48 PM

वुमन्स टी20 आशिया कप 2026 स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ खेळणार असून श्रीलंकेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. श्रीलंकन संघ गट ब मध्ये असून पहिला सामना 29 ऑगस्टला होणार आहे. हा सामना यजमान युएई संघाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. मागच्या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या टी20 मालिकेतील संघात तीन बदल केले आहेत. . निमाशा मीपेज, मल्की मदारा आणि रश्मिका सेववंडी यांना या संघातून डच्चू देण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी देवमी विहंगा, मिताली अयोध्या आणि आणि चेतना विमुक्ती यांची निवड झाली आहे. मध्यम गतीची वेगवान गोलंदाज मिताली अयोध्या हिचं संघात पुनरागमन झालं आहे. तर फिरकीपटू देवमी विहंगा हिला संघात पहिल्यांदाच स्थान मिळालं आहे. वेगवान गोलंदाज चेतनाला संधी दिली आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध फक्त वनडे मालिकेत खेळली होती, आता तिची टी20 संघात थेट एन्ट्री झाली आहे.

श्रीलंकेचा संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरत आहे. त्यांनी मागच्या पर्वात भारतीय संघाला पराभूत करून आशिया कप जेतेपद पटकावलं होतं. कर्णधार चमारी अटापट्टू ही श्रीलंकन संघाची ताकद आहे. अष्टपैलू खेळाडू असल्याने फलंदाजी गोलंदाजीतही योगदान देते. तिच्यात सामना एकहाती फिरवण्याची ताकद आहे. श्रीलंकेच्या संघात इनोका रणवीरा, सुगंधिका कुमारी आणि कविशा दिलहारी या जागतिक दर्जाच्या फिरकीपटू आहेत. आशियाई देशात फिरकीचं महत्त्व असल्याने संघाची ताकद वाढली आहे. त्यात देवमी विहंगा या नव्या लेग स्पिनरची भर पडली आहे. कविशा दिलहारी आणि हर्षिता समरविक्रमा या अष्टपैलू खेळाडू असून संघाला मधल्या फळीत स्थैर्य देण्यास सक्षम आहेत.

आशिया कप स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ

चमारी अटापट्टू (कर्णधार), इमेशा दुलानी, संजना कविंदी, विशमी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा (उपकर्णधार), कविशा दिलहारी, नीलाक्षिका सिल्वा, हासिनी परेरा, कौशिनी नुथ्यांगना (विकेटकीपर), देवमी विहंगा, सुगंधिका कुमारी, चामुदी प्रबोदा, चेतना विमुक्ति, काव्या कविंदी, मिताली अयोध्या.

श्रीलंकेचे आशिया कप स्पर्धेतील सामने

  • पहिला सामना: श्रीलंका विरुद्ध युएई — 29 ऑगस्ट 2026 (शनिवार)
  • दुसरा सामना: श्रीलंका विरुद्ध इंडोनेशिया — 2 सप्टेंबर 2026 (बुधवार)
  • तिसरा सामना: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश — 6 सप्टेंबर 2026 (रविवार)
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us