
Steven Smith Denied A Single To Babar Azam: बिग बॅश लीग स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंमुळे फ्रेंचायझींच्या डोक्याला ताप झाला आहे. कारण हे खेळाडू विजय तर सोडा, पराभवासाठी कारणीभूत ठरत आहे. प्रत्येक सामन्यात काही ना काही उदाहरण पाहायला मिळत आहे. बिग बॅश लीग स्पर्धेच्या 37व्या सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं. सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानात सामना पार पडला. या सामन्यात एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सामन्याच्या 11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने एक धाव घेण्यास नकार दिला. बाबर आझमची संथ फलंदाजी पाहून स्मिथ वैतागलेला दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाणेफेकीचा कौल सिडनी सिक्सर्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सिडनी थंडरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 189 धावा केल्या आणि विजयासाठी 190 धावा दिल्या. डेविड वॉर्नरने या सामन्यात 65 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 110 धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सिडनी सिक्सर्स संघ उतरला. पाकिस्तानचा बाबर आझम आणि स्टीव्ह स्मिथ सलामीला आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी केली. पण बाबर आझमने 39 चेंडूत 7 चौकार मारत 47 धावा केल्या. 11 व्या षटकात स्टीव्ह स्मिथ बाबर आझमवर वैतागला. या षटकात त्याने तीन चेंडू निर्धाव घालवले. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक फिरवण्यासाठी सिंगल घेण्याच्या प्रयत्नात होता. पण स्मिथने धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे बाबर आझम वैतागलेला दिसला.
“They’ve said no run to that.”
Steve Smith knocked a run back off the bat of Babar Azam, so he could have the strike for the Power Surge! #BBL15 pic.twitter.com/BaZET2UF2t
— KFC Big Bash League (@BBL) January 16, 2026
स्टीव्ह स्मिथने हा निर्णय पावर सर्ज नियमामुळे घेतला. पॉवर सर्ज म्हणजेच यात सुरुवातीचे चार षटकं पावरप्ले खेळल्यानंतर 11 व्या षटकानंतर कधीही दोन षटकांचा पावरप्ले घेऊ शकतो. त्यामुळे 30 यार्डच्या बाहेर फक्त दोन खेळाडू ठेवले जातात. स्टीव्ह स्मिथ त्याचा फायदा उचलू इच्छित होता. स्टीव्ह स्मिथने 12 व्या षटकात या स्थितीचा लाभ उचलत एकूण 32 धावा काढल्या. पण असं असूनही बाबर आझम संतापलेलाच दिसला.