Imran khan : इम्रान खान यांच्या मदतीला सुनील गावस्कर, कपिल देव धावले; पाकिस्तानकडे काय मागणी केली?

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मदतीला सुनील गावस्कर, कपिल देव धावले आहेत. त्यांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहून महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

Imran khan : इम्रान खान यांच्या मदतीला सुनील गावस्कर, कपिल देव धावले; पाकिस्तानकडे काय मागणी केली?
| Updated on: Aug 24, 2026 | 7:58 AM

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर, कपिल देव आणि दिलीप वेंगसकर यांच्यासहित 21 माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला एक पत्र लिहलं आहे. जगभरातील क्रिकेटचे माजी कर्णधार हे तुरूंगात कैद असलेले माजी पंतप्रधान आणि विश्व कप विजेते कर्णधार इम्रान खान यांच्या मदतीला धावले आहेत. या सर्व माजी कर्णधारांनी इम्रान खान यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी विशेष मागणी केली आहे. खरंतर याची सुरुवात ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी केली. त्यानंतर आता माजी कर्णधारांनी देखील 73 वर्षीय इम्रान खान यांना चांगली वागणूक मिळावी आणि आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे.

माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला उद्देशून सोशल मीडियावर एक पत्र शेअर केलं. या पत्रात म्हटलं की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या डॉक्टरांच्या टीमला इम्रान खान यांच्या आरोग्याची तपासणी करण्याची परवानगी द्यावी. तसेच पत्रात त्यांनी इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी कमी झाली आहे, त्यावरूनही चिंता व्यक्त केली आहे. कोर्टाने कुटुंबाला आठवड्यातून एकदा इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी दिली आहे, त्याचाही विचार करावा. वैद्यकीय तपासणीत सुचवण्यात आलेले उपचार विनाविलंब उपलब्ध करून द्यावेत, या मागण्या केल्या आहेत.

काय आहेत तीन महत्वाच्या मागण्या?

पहिली मागणी : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या या डॉक्टरांच्या टीममध्ये इम्रान खान यांच्या विशेष डॉक्टरांचाही समावेश आहे. एका रिपोर्टमध्ये त्यांच्या उजवळ्या डोळ्याची दृष्टी गेल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या तपासणीसाठी स्वतंत्रपणे परवानगी देण्यात यावी.

दुसरी मागणी : कोर्टाने परवानगी दिलेल्या आठवड्यातून एकदा कौटुंबिक भेटीची परवानगी द्यावी. यात कोणताही अडथळा आणू नये.
तिसरी मागणी : वैद्यकीय तपासणीचा निकाल काही असो. परंतु त्यांना कोणत्याही विलंबाशिवाय उपचार मिळाले पाहिजे. त्यांचं वय आता 73 इतके आहे. ते मागील 3 वर्षांपासून तुरूंगात आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण व्हावी. सर्व वैद्यकीय उपचार कोणत्याही विलंबाशिवाय मिळावेत. आम्हाला विश्वास आहे की, क्रिकेट खेळणारा प्रत्येक देश ही मागणी मान्य करेल. इम्रान खान यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us