AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavadya Dongar : कुणाल चांदगुडेच्या कुटुंबाने गाव का सोडलं? प्रकरणात नवा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर

छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली, चांदगुडे कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. दरम्यान चांदगुडे प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Khavadya Dongar : कुणाल चांदगुडेच्या कुटुंबाने गाव का सोडलं? प्रकरणात नवा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर
कुणाल चांदगुडे प्रकरणात नवा दावा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 7:51 AM
Share

शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, चांदगुडे कुटुंबातील तीन व्यक्तींचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. मृतांमध्ये मुलगा कुणाल चांदगुडे, आई सांगितला चांदगुडे आणि वडील मुरलीधर चांदगुडे यांचा समावेश आहे. सुरुवातीला कुणाल याने आयफोनसाठी हे पाउल उचलल्याचं बोललं जात होतं. मात्र आता या प्रकरणात दररोज नवनीन खुलासे होत आहेत. चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूनंतर कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबाकडून कुणालची आई संगीता चांदगुडे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. संगिता चांदगुडे यांच्यामुळेच आमचा मुलगा आमच्यापासून दूर गेला असा आरोप मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे मात्र संगीता चांदगुडे यांच्या माहेरच्या लोकांकडून या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुलरीधर चांदगुडे यांच्याच कुटुंबावर आरोप होत आहेत. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुणालची मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी या प्रकरणावर बोलताना मोठा खुलासा केला आहे.  ही घटना का घडली? कशी घडली? त्या मागची कारणं काय होती? हे सगळं समोर येईलच परंतु आम्हाला दु:खातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्या असं कुणालच्या मावशीने म्हटलं आहे.

तसेच कुणालच्या वडिलांनी वीस वर्षांपूर्वी गाव सोडलं होतं, त्यांनी गाव का सोडलं हे सांगताना कुणालच्या मावशीने धक्कादायक खुलासा केला आहे. मुलाची एवढीच जर काळजी होती तर वीस वर्षांपूर्वी मुलाने गाव आणि शेत सोडावं, यासाठी मग त्याच्या डोक्यात फावडलं का घातलं होतं? असा सवालही पल्लवी जऱ्हाड यांनी केला आहे. दरम्यान आतापर्यंत विविध माध्यमांमधून जी माहिती समोर येत आहे. त्यावरून तरी या घटनेमागे कौटुंबीक वादाचीच पार्श्वभूमी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुणाल हा मानसिक दबावामध्ये होता, तो डिप्रेशनमध्ये होता अशी माहिती देखील समोर येत आहे. कुणालची आई संगिता यांचे देखील अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामधून देखील या कुटुंबामध्ये अंतर्गत वाद होता, असा अंदाज लावला जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ