AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भन्नाट बुमराह चतुर आणि चलाख, ‘लिटिल मास्टर्स’कडून तोंडभरुन कौतुक, गावस्करांनी कारणही सांगितलं!

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात बुमराहने फलंदाजीनेही मोठे योगदान दिले आणि मोहम्मद शमीसोबत 89 धावांची भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले. बुमराहची ही कामगिरी पाहून भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर त्याचे चाहते बनले आहेत. गावस्कर यांनी बुमराहची तोंडभरुन स्तुती केली आहे.

भन्नाट बुमराह चतुर आणि चलाख, 'लिटिल मास्टर्स'कडून तोंडभरुन कौतुक, गावस्करांनी कारणही सांगितलं!
Sunil Gavaskar_Jasprit Bumrah
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 4:32 PM
Share

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका (भारत विरुद्ध इंग्लंड) अपेक्षेप्रमाणे संपू शकली नाही. पाचवा कसोटी सामना सुरु होण्याच्या दोन तास आधी सामना रद्द करण्यात आला. कारण भारतीय संघात कोरोनाने शिरकाव केला होता. ज्यामुळे खेळाडूंनी मैदानात जाण्यास नकार दिला. शेवटचा सामना रद्द होण्यापूर्वी भारत मालिकेत 2-1 ने पुढे होता. या मालिकेतून भारताला अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या. तसंच रोहित शर्मानेही इंग्लंड दौऱ्यात सकारात्मक गोष्टी घडल्याचं सांगितलं. अनेक फलंदाज पुन्हा जुन्या फॉर्मात आले. या मालिकेत भारताच्या एका महत्त्वाच्या खेळाडूलाही त्याची हरवलेली लय परत मिळाली. जसप्रीत बुमराह असं त्याचं नाव… इंग्लंड मालिकेपूर्वी बुमराहने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली नव्हती. या महत्त्वपूर्ण सामन्यात बुमराहला एकही विकेट मिळाली नव्हती. पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने दमदार पुनरागमन केले आणि चार सामन्यात 18 बळी मिळवले.

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात बुमराहने फलंदाजीनेही मोठे योगदान दिले आणि मोहम्मद शमीसोबत 89 धावांची भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले. बुमराहची ही कामगिरी पाहून भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर त्याचे चाहते बनले आहेत. गावस्कर यांनी बुमराहची तोंडभरुन स्तुती केली आहे.

चतुर बुमराह

“बुमराह हा अतिशय हुशार गोलंदाज. तो महत्त्वाच्या क्षणी चतुर पद्धतीने गोलंदाजी करतो. तो असा खेळाडू आहे जो कालच्या तुलनेत आज स्वतःला अधिक चांगलं पाहू इच्छितो, मग तो गोलंदाजी असो किंवा फलंदाजी. तुम्ही बघा की त्याने स्वतःला कसे सिद्ध केले आहे आणि जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा त्याने भारतासाठी धावा कशा केल्या”, अशा शब्दात गावस्करांनी बुमराहचं तोंडभरुन कौतुक केलंय.

प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याने सिद्ध केलंय

“तो एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. तो सतत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. तो एक असा खेळाडू आहे ज्यावर आपण कधीही विश्वास ठेवू शकतो. तुम्ही त्याला कठीण परिस्थितीत बॉल द्या, तो म्हणेल ठीक आहे, मी तुम्हाला पाहिजे तसं करुन देतो”, असंही गावस्कर म्हणाले.

गावस्कर म्हणाले, “तुम्ही त्याला मर्यादित षटकांमध्ये पांढऱ्या बॉलने गोलंदाजी करताना पाहिले. तो आयपीएलमध्ये कसा बोलिंग करतो आणि वनडेमध्ये कसा बोलिंग करतो, प्रत्येक फॉरमॅटमध्ये तो स्वत:ला सिद्ध करत आलाय”, असंही गावस्कर म्हणाले.

हे ही वाचा :

Ravi Shastri : टी 20 वर्ल्ड कपनंतर कोच कोण? सौरव गांगुलीचे मोठे संकेत

सिक्सर किंग युवराजला वर्ल्डकपमध्ये घाम फोडला, करिअरवरच संकट, आता घातक गोलंदाजाचा क्रिकेटला रामराम

IPL 2021 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीला झटका, पहिल्याच सामन्यात संकट, विश्वासू खेळाडू बाहेर!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.