SRH vs DC Live Streaming : हैदराबाद-दिल्लीत 2 पॉइंट्ससाठी टफ फाईट, ऑरेंज आर्मी जिंकणार?
Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals IPL 2026 Live Scorecard : हैदराबाद-दिल्लीत 2 पॉइंट्ससाठी टफ फाईट पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिट्ल्स ऑरेंज आर्मीला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 31 व्या सामन्यात सोमवारी 21 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. इशान किशन हैदराबादच्या टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर ऑलराउंडर अक्षर पटेल याच्याकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा आहे. हैदराबादच्या एका सामन्याचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघांची सारखीच स्थिती आहे. हैदराबादने आतापर्यंत 6 तर दिल्लीने 5 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी समसमान 3–3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता एकमेकांसमोर दोघांपैकी कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यानिमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामना कधी होणार?
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामना मंगळवारी 21 एप्रिलला होणार आहे.
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामना कुठे होणार?
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामना राजीव गांधी स्टेडियममध्ये, हैदराबादमध्ये होणार आहे.
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होईल. नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे निर्णायक ठरणार आहे.
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येईल?
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे मॅच मोबाईलवर लाईव्ह पाहायला मिळेल.
दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती
हैदराबादने 6 पैकी 3 सामने जिंकलेत. हैदराबादच्या खात्यात 6 गुण आहेत. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये +0.566 अशा नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. तर दिल्लीने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. मात्र हैदराबादपेक्षा नेट रनरेट कमी असल्याने दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स, दोघांपैकी वरचढ कोण?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात मंगळवारी होणारा 27 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात एकूण 26 वेळा आमनासामना झाला आहे. एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. हैदराबादने 26 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने हैदराबादवर 12 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये 2 गुणांसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.