SRH vs PBKS Live Streaming : हैदराबाद विरुद्ध पंजाब कडवी झुंज, कोण मिळवणार सातवा विजय?
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings IPL 2026 Live Scorecard : प्लेऑफच्या हिशोबाने सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे 2 गुणांसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

क्रिकेट चाहत्यांना बुधवारी 6 मे रोजी हायव्होल्ट सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 49 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. सनरायजर्स हैदराबादचा हा 11 वा आणि पंजाब किंग्सचा 10 वा सामना असणार आहे. पॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांकडे हा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकण्याची संधी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्याच चढाओढ पहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना कधी?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना बुधवारी 6 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद इथे होणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.