AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव याने वनडे फॉर्मेट केला क्रॅक! पहिल्या 10 चेंडूंचं असं असतं गणित

Suryakumar Yadav : वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव याला सूर गवसला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सलग दोन अर्धशतकं ठोकली आहे. या सामन्यांसाठी सूर्यकुमार यादव याने खास रणनिती आखली होती. चला जाणून घेऊयात नेमकं काय केलं ते...

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव याने वनडे फॉर्मेट केला क्रॅक! पहिल्या 10 चेंडूंचं असं असतं गणित
वनडेत सुपर फ्लॉप ठरलेल्या सूर्यकुमार यादव याला कसा सापडला सूर, पहिल्या 10 चेंडूत करतो असं काही...
| Updated on: Sep 25, 2023 | 9:20 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. मालिका 2-0 ने खिशात तर घातली, त्याचबरोबर वर्ल्डकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून वनडेत फ्लॉप ठरलेल्या सूर्यकुमार यादव याला सूर गवसला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. पहिल्या सामन्यात 50 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 72 धावांची खेळी केली. दुसऱ्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव याचा 360 डिग्री अंदाज पाहायला मिळाला. टी20 फॉर्मेटमध्ये हिरो ठरलेला सूर्यकुमार यादव वनडेत का चालत नाही? असा प्रश्न पडला होता.पण यावेळी त्याने वनडे क्रिकेट फॉर्म्युला क्रॅक केल्याचं दिसून आलं. क्रीडाप्रेमींनी त्याची शैली पाहून हा अंदाज बांधला आहे.

पहिल्या 10 चेंडूंचं कसं असतं गणित?

वनडे क्रिकेट हे टी20 क्रिकेटपेक्षा वेगळं आहे. या फॉर्मेटमध्ये फलंदाजाला सेट होण्यास अधिकचा वेळ मिळतो. मग तो गोलंदाज असो की फलंदाज..सूर्यकुमार यादव याने हे गणित हेरलं आहे. त्यामुळे तो पहिले दहा चेंडू संयमी वृत्तीने खेळतो. याचा अंदाज दोन वनडे सामन्यावरून घेता येईल. मोहालीत सूर्यकुमार यादव याने 11 चेंडूत 7 धावा केल्या आणि इंदुरमध्ये 9 चेंडूत फक्त 4 धावा केल्या. यावरून चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो की नाही? याचा अंदाज घेतो आणि नॅच्युरल गेम खेळण्यास सुरुवात करतो.

इंदुरमध्ये 9 चेंडूत 4 धावा केल्यानंतर सूर्याने पुढच्या चार चेंडूंवर सलग चार षटकार ठोकले. त्याने 14 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. स्वीप हा सूर्यकुमार यादव याचा आवडीचा शॉट आहे. पण आशिया कप स्पर्धेत हा शॉट खेळताना बाद झाल होता. त्यावेळी त्याने 26 धावा केल्या होत्या. तो बाद झाल्यानंतर सामन्यावरील पकड सैल झाली आणि भारताने हा सामना 6 धावांनी गमावला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन्ही सामन्यात हा शॉट खेळणं सूर्यकुमार यादव याने टाळलं. इंदुरमध्ये अर्धशतकी खेळी केल्यानंतर हा शॉट आपल्या भात्यातून काढला. दोन दशकांपूर्वी असाच काहीसा निर्णय मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने घेतला होता. यात सचिन कवर ड्राईव्ह मारताना बाद होत होता. सिडनी कसोटीत सचिनने 241 धावांची खेळी केली. यात एकही कवर ड्राईव्ह मारला नाही.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.